गुजरातच्या समुद्रात खळबळ; भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानी मासेमारी बोट पकडली, ११ जण ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 23:16 IST2025-12-11T23:11:59+5:302025-12-11T23:16:13+5:30
भारताच्या सीमेत घुसलेल्या ११ पाकिस्तानी नागरिकांना 'तटरक्षक दला'ने जाखौजवळ पकडले

गुजरातच्या समुद्रात खळबळ; भारतीय तटरक्षक दलाने पाकिस्तानी मासेमारी बोट पकडली, ११ जण ताब्यात
Indian Coast Guard:गुजरातच्या जाखौ तटाजवळ भारतीय तटरक्षक दलाने मोठी कारवाई करत भारतीय जलसीमेत अनधिकृतपणे घुसलेल्या एका पाकिस्तानी बोटीसह ११ पाकिस्तानी नागरिकांना अटक केली आहे. बुधवारी रात्रीच्या वेळी ही कारवाई करण्यात आली.
संशयास्पद 'अल वली' बोटीवर कारवाई
संरक्षण जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय तटरक्षक दलाच्या पथकाने जाखौ तटापासून काही सागरी मैल दूर, भारतीय क्षेत्रात संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका बोटीला घेरले. अल वली नावाच्या या पाकिस्तानी मासेमारी बोटीवर एकूण ११ खलाशी पाकिस्तानी नागरिक होते.
In a swift operation on 10 Dec 25, @IndiaCoastGuard
— PRO Defence Gujarat (@DefencePRO_Guj) December 11, 2025
apprehended a #Pakistani fishing boat with 11 crew inside the #Indian#EEZ. This interdiction underscores #BhartiyaTatrakshak's sustained maritime operations and India's commitment to securing its maritime frontiers while… pic.twitter.com/BYZSLcBvLS
आयसीजीने जारी केलेल्या निवेदनानुसार, या सर्व ११ पाकिस्तानी नागरिकांना बोटीसह ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील चौकशीसाठी आणि बोटीची कसून तपासणी करण्यासाठी त्यांना जाखौ बंदरावर आणले गेले आहे. ही कारवाई भारताच्या सागरी सीमांच्या सुरक्षिततेसाठी आणि आंतरराष्ट्रीय सागरी कायद्यांचे पालन करण्यासाठी तटरक्षक दल कटिबद्ध आहे, हे दर्शवते.
भारत-बांग्लादेशमध्ये मच्छिमारांचे यशस्वी प्रत्यार्पण
दरम्यान, याच आठवड्याच्या सुरुवातीला भारत आणि बांगलादेशमध्ये प्रत्यार्पण यशस्वीरित्या पार पडले. नकळतपणे आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषा ओलांडून दुसऱ्या देशाच्या जलक्षेत्रात गेलेल्या मच्छिमारांची दोन्ही देशांनी अदलाबदल केली
परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, ९ डिसेंबर २०२५ रोजी दोन्ही देशांनी परस्पर सहमतीने एकूण ४७ भारतीय मच्छिमार आणि ३८ बांगलादेशी मच्छिमारांना त्यांच्या बोटींसह सुरक्षितपणे आपापल्या देशात परत पाठवले. जानेवारी २०२५ मध्येही अशाच पद्धतीने ९५ भारतीय आणि ९० बांगलादेशी मच्छिमारांची सुटका करण्यात आली होती.