कोल इंडियाचे विभाजन नाही, सरकारची स्पष्टोक्ती
By Admin | Updated: June 30, 2014 00:52 IST2014-06-30T00:52:48+5:302014-06-30T00:52:48+5:30
जगातील सर्वात मोठय़ा कोळसा खाण कंपनीचे तुकडे पडू देणार नाही़ त्यापेक्षा कंपनीच्या प्रगतीतील सर्व अडथळे सरकार दूर करेल, अशी स्पष्टोक्ती गोयल यांनी दिली़

कोल इंडियाचे विभाजन नाही, सरकारची स्पष्टोक्ती
>नवी दिल्ली : कोल इंडिया या सार्वजनिक क्षेत्रतील कोळसा कंपनीच्या विभाजनाच्या शक्यतांना ऊर्जा व कोळसामंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी पूर्णविराम दिला़ नवे सरकार जगातील सर्वात मोठय़ा कोळसा खाण कंपनीचे तुकडे पडू देणार नाही़ त्यापेक्षा कंपनीच्या प्रगतीतील सर्व अडथळे सरकार दूर करेल, अशी स्पष्टोक्ती गोयल यांनी दिली़
देशभरात विनाव्यत्यय वीजपुरवठा शक्य व्हावा, यासाठी कोळसा क्षेत्रतील समस्या लवकर निकाली काढण्यावर सरकारचा भर आहे. कोल इंडियाच्या सात कंपन्यांना स्वतंत्र कंपन्यांमध्ये रूपांतरित करण्याऐवजी तिला एकसंघ अशी एक कंपनी ठेवून प्रगती साधली जाऊ शकते, असे गोयल यावेळी म्हणाल़े (लोकमत न्यूज नेटवर्क)
-2013-14 मध्ये 48़2 कोटी टन कोळसा उत्पादनाचे लक्ष्य कोल इंडिया पूर्ण करू शकली नाही़ यादरम्यान कंपनीने केवळ 46़2 कोटी टन कोळसा उत्पादन केल़े कोल इंडियाच्या सात संलग्न कंपन्या आहेत़ यापैकी साऊथ-ईस्टर्न कोलफील्डस् आणि महानदी कोलफील्डस् या दोन कंपन्यांचा कोल इंडियाच्या एकूण उत्पादनात अध्र्यापेक्षा अधिक वाटा आह़े