शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
3
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
4
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
5
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
6
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
7
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
8
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
9
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
10
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
11
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
12
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
13
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
14
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
15
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
16
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
17
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
18
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
19
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
20
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?

कोळशामुळे सर्वाधिक प्रदूषण, पण भारतात याचा वापर बंद होऊ शकत नाही; जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 18:33 IST

भारतातील सुमारे दोनतृतीयांश वीजनिर्मिती कोळसा ऊर्जा प्रकल्पातून होते. एवढेच नाही तर देशातील लोकसंख्येचा मोठा वर्ग कोळसा उद्योगावर अवलंबून आहे.

नवी दिल्ली:जगातील हवामान बदल थांबवण्यासाठी जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व लवकरात लवकर कमी करणे आवश्यक आहे. यामध्ये सर्वात मोठे आव्हान आहे ते कोळशाचा वापर, जो अजूनही चीन आणि भारतासारख्या देशांमध्ये वीज निर्मितीसाठी मुख्य इंधन म्हणून वापरला जात आहे. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा जीवाश्म इंधन उत्सर्जित करणारा देश आहे आणि कोळशावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. ग्लासगो हवामान परिषदेनंतर अनेक देशांवर जीवाश्म इंधनमुक्त होण्यासाठी दबाव वाढत असताना भारताचे कोळशावरचे अवलंबित्व संपवणे हे मोठे आव्हान आहे.

जीवाश्म इंधनावर पाश्चिमात्य देशभारतासारख्या विकसनशील देशातील जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व दूर करणे सोपे नाही. शेकडो वर्षांपूर्वी औद्योगिक क्रांती झाल्यापासून पाश्चिमात्य देशांनी जीवाश्म इंधन वापरुन जगाला प्रदूषित केले आणि विकसित देश बनले. आता तेच देश प्रदुषणाचे खापर विकसनशील देशांवर फोडत आहेत.

भारतातील कोळसा उद्योग

पाश्चिमात्य देश भारताला कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सांगत आहेत. अशा स्थितीत कोळशाचा वापर कमी करण्यावर भर दिला जातोय. कोळसा हा जीवाश्म इंधनाचा सर्वात वाईट प्रकार आहे, परंतु भारताच्या ऊर्जा उत्पादनात त्याचा वाटा 70 टक्के आहे. इतकेच नाही तर भारतातील पायाभूत सुविधाही नजीकच्या भविष्यात दुसऱ्या स्त्रोताकडे जाण्यास अजिबात तयार नाही. 

काहींसाठी कोळसा जगण्याचे साधनब्रुकिंग्स संस्थेच्या एका रिपोर्टनुसार, भारतातील कोळसा उद्योगात सुमारे 4 दशलक्ष लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत. यापैकी बहुतेक कोळसा खाणी पूर्वेला आहेत, ज्यांना कोळसा पट्टा म्हणतात. या खाणी झारखंड, छत्तीसगड किंवा ओडिशामध्ये आहेत. या भागातील अर्थव्यवस्थेत कोळशाचे मोठे योगदान आहे आणि हा कोळसा काही स्थानिकांसाठी जगण्याचे साधन आहे.

मोठे संकट येईल

आंतरराष्ट्रीय दबावाखाली कोळसा उत्पादन बंद केले तर भारतातील अनेक लोक बेघर होतील. हजारो कुटुंबांवर आर्थिक संकट येईल. अनेक दशकांपासून खाणींमध्ये काम करुन हे लोक आपला उदरनिर्वाह करत आहेत. भारतात ऊर्जेची मागणी वाढत आहे. गेल्या दशकात कोळशाचा वापर दुपटीने वाढला आहे. भारताला अजूनही मोठ्या प्रमाणात कोळसा आयात करावा लागतो आणि येत्या काही वर्षांत अनेक खाणींमध्ये खाणकाम सुरू करण्याची योजना आहे. दरम्यान, भारतीय व्यक्ती अमेरिकन किंवा ब्रिटिश नागरिकांपेक्षा खूपच कमी वीज वापरतो. 

टॅग्स :Coal Shortageकोळसा संकटpollutionप्रदूषणIndiaभारत