आयुक्तांना घेराव
By admin | Updated: June 6, 2015 00:11 IST
आयुक्त कार्यालयाला पोलिसांचा घेराव
आयुक्तांना घेराव
आयुक्त कार्यालयाला पोलिसांचा घेरावमुंबई: पोलीस निरिक्षक, सहाय्यक पोलीस निरिक्षकांपाठोपाठ पोलीस शिपायांमधूनही बदलीबाबत नाराजीचा सुरु उमटण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी दुपारी बदलीवर नाखुश असलेल्या शेकडो शिपायांनी थेट पोलीस आयुक्तालय गाठले. मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरील कर्मचारी आणि महिला वर्गालाच आतमध्ये प्रवेश दिला. या सर्वांना उपायुक्त(मुख्यालय-२) यांच्याकडे लेखी अर्ज करण्याचे व त्यात पसंतीची तीन पोलीस ठाण्यांचा उल्लेख करण्याच्या सूचना आयुक्त मारिया यांनी केल्या. याच आठवडयात मुंबई पोलीस दलातल्या सुमारे ९ हजार पोलीस शिपायांच्या शहरातल्या अन्य पोलीस ठाण्यांमध्ये व अन्य गटांमध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत.