सीएनएक्स- पाळणाघराच्या पुढची पायरी डे केअर सेंटर्स ..1
By Admin | Updated: May 18, 2015 01:16 IST2015-05-18T01:16:19+5:302015-05-18T01:16:19+5:30
- आता बाळासाठी नोकरी सोडायची गरज नाही - नागपुरातही रुजतेय पाश्चिमात्य संकल्पना

सीएनएक्स- पाळणाघराच्या पुढची पायरी डे केअर सेंटर्स ..1
- ता बाळासाठी नोकरी सोडायची गरज नाही - नागपुरातही रुजतेय पाश्चिमात्य संकल्पनाआज कितीतरी विवाहित मुलींना त्यांचं करिअर महत्त्वाचं वाटत असतं. यासाठी लग्नाच्या आधीपासूनच त्यांचे प्रयत्न सुरूही झालेले असतात. परंतु लग्न झाले की जीवनाची दिशा बदलते आणि बाळाचे आगमन झाले की आधी ठरवलेल्या अनेक योजनांना थेट गुंडाळूनच ठेवावे लागते. लग्नानंतर नोकरी सोडणं म्हणजे कित्येक जणींना मूर्खपणाचं वाटतं. त्यामुळे अनेक जणी आपल्या मुलांना आपल्या ओळखीच्या नातेवाईकांकडे ठेवतात किंवा मग आपल्या आई आणि सासूचं घर जवळ असेल तर त्यांची मदत मागतात. परंतु जे जोडपे आपल्या शहरापासून लांब राहतात त्यांना पाळणाघराचाच आधार घ्यावा लागतो. परंतु पाळणाघरात केवळ मुलांचा सांभाळ केला जातो. त्यांच्या शिक्षणाची वा मनोरंजनाची येथे फारशी सोय नसते. म्हणूनच आता डे केअर सेंटर्स जन्माला आले असून, येथे मुलांच्या चौफेर विकासाकडे विशेष लक्ष दिले जाते. डे केअर सेंटर्स ही मूळची पाश्चिमात्य संकल्पना असली तरी ती आपल्या नागपुरातही छान रुजायला लागली असून, अनेक पालकांना आता बाळासाठी नोकरी सोडायची गरज राहिलेली नाही.तारेवरच्या कसरतीवर प्रभावी पर्यायमूल लहान असतं आणि नोकरीची गरज असते तेव्हा नोकरी आणि मूल सांभाळणं ही तारेवरची कसरत असते. अशा वेळी मुलांचा सांभाळ हा जोडप्यांपुढे मोठा प्रश्न असतो. अशा वेळी डे केअर सेंटर्स किंवा चाईल्ड सेंटर्स ऑफिसच्या आसपास असेल तर त्या जोडप्याचा केवढा तरी मोठा प्रश्न सुटल्यात जमा होईल. आपल्या नागपुरात अशी काही सेंटर्स हळूहळू उदयाला येत आहेत. अनेक जोडपी सकाळी ९-१० वाजता घर सोडलं की घरी परत यायला रात्रीचे ८ वाजतात. दिवसभराच्या कामाने आणि ताणाने थकून जातात. स्वत:चं आवरण्यापलीकडे त्यांच्याकडे वेळच नसतो. पण लग्नानंतर दोन वर्षांनी त्यांना बाळ झाले की मग पुढे नोकरीचा प्रश्न उभा ठाकतो. प्रसूतीनंतरचे सहा महिने भुर्रकन उलटून जातात. मात्र त्यानंतर पुढे काय? अशात नोकरीसाठी जायचे लागल्यास बाळ कुठे ठेवायचे, हा प्रश्न समोर येतो. मग त्यांच्याजवळ पर्याय म्हणजे एकच, पाळणाघर. पण घरगुती पाळणाघर म्हणजे वेळेची मर्यादा ही आलीच. यावर पर्याय डे केअर सेंटर ठरले आहेत.