नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 02:57 IST2025-09-14T02:54:42+5:302025-09-14T02:57:56+5:30
...यामुळे त्यांनीही जनतेच्या तक्रारी धैर्याने ऐकायला हव्यात आणि त्या तर्कसंगतपणे सोडवल्या हव्यात, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते शनिवारी एका कार्यक्रमात बोलत होते.

नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नेपाळमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांसंदर्भात पहिल्यांदाच भाष्य केले आहे. जर छोट्या-छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले, तर त्या मोठ्या समस्या बनू शकतात, जसे नेपाळमध्ये घडले. या समस्या संवेदनशीलतेसह सक्रियपणे सोडवल्या जायला हव्यात. लोकप्रतिनिधींनाही लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. यामुळे त्यांनीही जनतेच्या तक्रारी धैर्याने ऐकायला हव्यात आणि त्या तर्कसंगतपणे सोडवल्या हव्यात, असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते शनिवारी एका कार्यक्रमात बोलत होते.
डॉक्टरांनाही सल्ला -
राम मनोहर लोहिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या स्थापना दिनाच्या समारंभाला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांशी वागताना डॉक्टरांनी संवेदनशीलता दाखवावी यावरही भर दिला. मुख्यमंत्री म्हणाले, "आपण (राजकारणी) देखील अशाच परिस्थितींना तोंड देत असतो. यामुळे समस्या समजून घेणे आणि योग्य उपाय शोधणे हे आपले कर्तव्य आहे."
'छोट्या-छोट्या गोष्टीही बणूशकतात मोठ्या -
आदित्यनाथ म्हणाले, "छोट्या-छोट्या गोष्टी कधीकधी आपल्यासाठी मोठ्या समस्या बनतात. नेपाळमध्ये काय घडले ते तुम्ही पाहिले असेलच. लोकांनी सोशल मीडियाकडे दुर्लक्ष केले, परिणाम काय झाला? विकास आणि प्रगती कशी थांबली? अशा घटना इतरत्र घडू नयेत यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपापल्या क्षेत्रात सतर्क रहायला हवे."