शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

आपत्तीत संधी! योगी आदित्यनाथ दीड लाख प्रवासी मजुरांना देणार जॉबचं ऑफर लेटर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 1:32 PM

सरकारकडून सर्व सवलती मिळाल्यानंतर आता यास गती मिळणे अपेक्षित आहे.

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आपत्तीतील संधी' या आवाहनाना प्रतिसाद देत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. उत्तर प्रदेशमधील मोठ्या संख्येने आलेले स्थलांतरित मजूर आणि कामगारांचे कौशल्य ओळखून त्यांना रोजगाराची संधी देण्यात येणार आहे. त्यानुसार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुमारे दीड लाख प्रवासी मजूर व कामगारांना नोकरीची ऑफर देणार आहेत. संबंधित कौशल्याची ओळख पटल्यानंतर कामगारांना ऑफर लेटर देण्यात येणार आहे. ज्यांना आज ऑफर लेटर मिळेल त्या सर्वांना वस्त्रोद्योगासह रिअल इस्टेट क्षेत्रात काम मिळेल. कोरोनाच्या संकटापायी रिअल इस्टेट क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सरकारकडून सर्व सवलती मिळाल्यानंतर आता यास गती मिळणे अपेक्षित आहे.कोरोना विषाणूच्या संसर्गादरम्यान लॉकडाऊनच्या वेळी राज्यातून परत आलेल्या परप्रांतीय कामगार आणि मजुरांची संख्या लाखोंमध्ये आहे. योगी आदित्यनाथ सरकार त्यांच्या कौशल्याच्या जोरावर त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंगळवारी त्यांच्या शासकीय निवासस्थानी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुमारे दीड लाख स्थलांतरित मजूर आणि कामगारांना रोजगार ऑफर लेटर देणार आहे. त्यांना एमएसएमई सेक्टर आणि रिअल इस्टेटमधून हे रोजगार उपलब्ध होणार  आहेत. लखनौ येथे होणारा हा कार्यक्रम सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग व एंटरप्राइझेस प्रमोशन विभागानं आयोजित केला आहे. आज ज्या स्थलांतरित कामगारांना नोकरीसाठी ऑफर लेटर देण्यात येतील त्यांना नोएडाच्या वस्त्रोद्योग क्षेत्रात काम मिळेल.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल सांगितले की, मनरेगा अंतर्गत 57 लाख 12 हजार मजुरांना काम मिळाले आहे. ही संख्या सध्या देशात सर्वाधिक आहे. यानंतर सर्व औद्योगिक युनिटचे सर्वेक्षण करून या युनिटमधील रोजगाराची संधी लक्षात घेऊन मागणीनुसार मनुष्यबळ पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. परत आलेल्या मजूर व कामगारांचे पुन्हा स्थलांतर होऊ नये, म्हणून प्रत्येकाला त्यांच्या योग्यतेनुसार, अनुभवानुसार व क्षमतेनुसार रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी अधिका-यांना दिल्या आहेत. यासाठी एक्सप्रेस वे, मेडिकल कॉलेज, विद्यापीठ, रस्ते बांधकाम, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही केल्या आहेत.अकुशल कामगार रोजगारामध्ये उत्कृष्टकोरोना व्हायरस आपत्तीच्या विचित्र परिस्थितीतही अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात उत्तर प्रदेश अव्वल ठरलं आहे. सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले की, सध्या उत्तर प्रदेशमध्ये 5712975 अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. अकुशल कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यात राष्ट्रीय स्तरावरील 18 टक्के उत्तर प्रदेशाचा वाटा आहे.

हेही वाचा

CoronaVirus News: अमेरिकेनं मैत्री निभावली; भारताकडे १०० व्हेंटिलेटर्स सोपवली

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथcorona virusकोरोना वायरस बातम्या