For cm Yogi Adityanath Visit UP administration Orders Engineers To Catch Cows Retracts | मुख्यमंत्र्यांच्या मार्गात येणारे गाय-बैल पकडा; नऊ अभियत्यांवर विचित्र जबाबदारी
मुख्यमंत्र्यांच्या मार्गात येणारे गाय-बैल पकडा; नऊ अभियत्यांवर विचित्र जबाबदारी

लखनऊ: आपल्या पशूप्रेमामुळे कायम चर्चेत राहणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका अजब आदेशामुळे चर्चेत आले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्या गंगा यात्रेदरम्यान त्यांच्या मार्गात गाय, बैल येऊ नये, याची जबाबदारी सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांकडे देण्यात आली. उद्या आदित्यनाथ गंगा यात्रेसाठी मिर्झापूरमध्ये येणार आहेत. 

गंगा यात्रेदरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या मार्गात गाय, बैल येऊ नयेत, याची जबाबदारी ९ अभियंत्यांवर सोपवण्यात आली. मात्र यावर बरीच टीका झाली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा आदेश तडकाफडकी मागे घेतला. सोमवारी हा आदेश जारी करण्यात आला होता. 'मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या यात्रेदरम्यान मिर्झापूर ते बिरोही दरम्यान ९ अभियंत्यांची ड्युटी लावण्यात आलेली आहे. या अभियंत्यांनी त्यांना नेमून देण्यात आलेल्या ठिकाणी हजर राहावं,' असं आदेशात नमूद करण्यात आलं होतं. प्रशासनाकडून काढण्यात आलेल्या या आदेशाबद्दल मिर्झापूरच्या इंजिनीयर असोसिएशननं सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. आमच्या अभियत्यांना पशू पकडण्याचं प्रशिक्षण देण्यात आलेलं नाही. कोणत्याही अभियंत्याला इजा झाल्यास असोसिएशन जबाबदार असणार नाही. त्यामुळे प्रशासनानं हे काम दुसऱ्या विभागाला द्यावं, अशी स्पष्ट भूमिका असोसिएशनकडून घेण्यात आली होती. 
 

Web Title: For cm Yogi Adityanath Visit UP administration Orders Engineers To Catch Cows Retracts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.