शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

Religious conversion case: 1000 हून अधिक लोकांचे धर्मांतरण! योगी सरकारची स्ट्रिक्ट अ‍ॅक्शन, दिले मोठे आदेश 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 1:55 PM

या धर्मांतरणाच्या मुळाशी आयएसआयचे फंडिंग आहे. एवढेच नाही, तर यासंदर्भात अनेक पुरावेही हाती लागले आहेत, असा दावा एटीएसने केला आहे.

लखनौ - उत्तर प्रदेश एटीएसने धर्मांतरणाची मोहीम चालविणाऱ्या मौलाना मोहम्मद उमर गौतम आणि मुफ्ती काजी जहांगीर या दोघांना लखनौ येथून अटक केली आहे. हे दोघेही दिल्लीतील जामिया नगर भागातील आहेत. यांनी गेल्या दीड वर्षात नोकरी, लग्न आणि पैशांचे अमिष दाखवून देशभरातील 1000 हून अधिक लोकांचे धर्मांतरण केल्याचा आरोप आहे. एटीएसच्या या खुलाशानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. यानंतर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्ट्रिक्ट अ‍ॅक्शन घेत आरोपींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) लावण्यात यावा, असा आदेश दिला आहे. एवढेच नाही, तर त्यांनी या आरोपींची सर्व संपत्ती जप्त करण्याचाही आदेश दिला आहे. 

असे पकडले गेले आरोपी -गाझियाबादमधील मसुरी पोलिसांनी 2 जूनला या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती. डासना देवी मंदिरात घुसण्याप्रकरणी तेथील सेवकांनी विपूल विजयवर्गीय आणि त्याचा साला कासिफ यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्याच्याकडून काही सर्जिकल ब्लेडही जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र, तेव्हा त्या ब्लेड कप थेरपीशी संबंधित आहेत, असे समोर आले होते. हे प्रकरण सुरक्षिततेशी संबंधित असल्याने एटीएमच्या टीमने या दोघांचीही चौकशी केली. यानंतर, या प्रकरणात विपूलचे धर्मांतरण करण्यासंदर्भात आणि त्यानंतर त्याचे कासिमच्या बहिनीसोबत लग्न करण्याची माहिती समोर आली होती.

पती 4 वर्षांपासून शोधत होता आपली 'सीमा', प्रियकरासोबत 'सना'ला पाहून बसला धक्का! पोलीसही चक्रावले

10 जूनला पुन्हा एकाला अटक -धर्मांतरण आणि त्यात विजयनगर येथील व्यक्तीचे नाव समोर आल्यानंतर एटीएसच्या टीमने विजयनगरमध्ये 10 जूनला पाळत ठेऊन सलीमुद्दीनची चौकशी केली होती. यानंतर त्यालाही मसुरी पोलिसांनी अटक केली. 

आयएसआयच्या फंडिंगने सुरू होता खेळ - या धर्मांतरण प्रकरणासंदर्भात बोलताना उत्तर प्रदेश एटीएसने म्हटले आहे, की या धर्मांतरणाच्या मुळाशी आयएसआयचे फंडिंग आहे. एवढेच नाही, तर यासंदर्भात अनेक पुरावेही हाती लागले आहेत, असा दावाही एटीएसने केला आहे. तसेच, एटीएसने आपल्या एफआयआरमध्येही दावा केला आहे, की हे रॅकेट धर्मांतराच्या माध्यमाने देशातील लोकसंख्या संतुलन बिघडविण्यासाठी काम करत होते.

धक्कादायक! उत्तर प्रदेशात एक हजार मुस्लिमेतरांचे धर्मांतरण, महिलांचे लग्नही लावले; पोलिसांचा खळबळजनक दावा 

सहाहून अधिक राज्यांत पसरले आहे नेटवर्क - उत्तर प्रदेशशिवाय, महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, आंध्र प्रदेश आणि केरळ येथेही या रॅकेटचे नेटवर्क आहे. या रॅकेटच्या माध्यमाने या सर्व राज्यांत 1000 हून अधिक लोकांचे धर्मांतरण करण्यात आल्याचे दस्तऐवज पोलिसांच्या हाती लागले आहेत. हे लोक उत्तर प्रदेशात नोएडा, वाराणसी, कानपूर, मथुरा, गाझियाबाद आणि इतर जिल्ह्यांत सक्रिय आहेत, असे एटीएसच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

दिल्लीतील जामिया नगर येथून चालविले जात होते नेटवर्क -उमर आणि त्याचा सहकारी जहांगीर, हे दिल्लीतील जामिया नगरमधील जोगाबाई एक्सटेन्शनमध्ये इस्लामिक दावाह सेंटर नावाच्या एका संस्थेमार्फत हे संपूर्ण नेटवर्क चालवत आहेत. एटीएसने आपल्या एफआयआरमध्ये या संस्थेच्या चेअरमनचाही समावेश केला आहे. या संस्थेचा उद्देश मुस्लिमेतरांचे धर्मांतरण करणे, असा आहे. या कामासाठी याच्या आणि संस्थेच्या बँक खात्यावर अनेक माध्यमांनी लाखो रुपये आल्याचे पुरावेही एटीएसला मिळाले आहेत. एटीएस संस्थेचे इनकम टॅक्स रिटर्न, बँक खात्यांची माहिती आणि गेल्या काही वर्षांत झालेल्या मोठ्या ट्रांझेक्शनचा तपास करत आहेत. परदेशातूनही फंडिंग झाल्याचे पुरावे एटीएसला मिळाले आहेत. एटीएस केंद्रीय एजन्सिज आणि गुप्तचर संस्थांच्या मदतीने या परदेशातील बँक खात्यांसंदर्भात माहिती मिळवत आहे.

“हिंदूनो, जर ‘हे’ षडयंत्र समजलं नाही तर नष्ट व्हाल”; महंत नरसिंहानंदांचं पुन्हा वादग्रस्त विधान

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसMuslimमुस्लीमHinduहिंदूIslamइस्लाम