मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 09:24 PM2020-02-21T21:24:00+5:302020-02-21T21:37:21+5:30

उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली

CM Uddhav Thackeray meets Prime Minister Sonia Gandhi! | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली सोनिया गांधींची भेट!

googlenewsNext
ठळक मुद्देउद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात जवळपास एक तास चर्चा झालीपंतधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. राज्याशी संबंधित अनेक विषयावर चर्चा झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

नवी दिल्ली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, शिवसेनेचे खासदार संजय राऊत, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. 

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता स्थापनेनंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. या एक तासाच्या भेटीच दोन्ही नेत्यांमध्ये काय नेमकी काय चर्चा झाली, याविषयी अद्याप कळू शकले नाही. मात्र, ही चर्चा कोणत्या विषयावर झाली, याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे. 

दरम्यान, पंतधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्याशी संबंधित अनेक विषयावर चर्चा झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नरेंद्र मोदींनी राज्यातील चांगल्या गोष्टी असतील, त्यामध्ये केंद्राचे सहकार्य असेल, असे आश्वासन दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

याशिवाय, सीएए, एनसीआर याबाबतही नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. सीएएवरून कोणाला घाबरण्याची गरज नाही. एनसीआर फक्त आसाम पुरते मर्यादित असून संपूर्ण देशात लागू होणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी एकप्रकारे सीएएला समर्थन दिल्याचे समजते.

(मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट!)

Web Title: CM Uddhav Thackeray meets Prime Minister Sonia Gandhi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.