...तर वीज महाग होईल; कंपन्या नफा कमावतील; नव्या वीज विधेयकाविरोधात ममतांनी दंड थोपटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 18:35 IST2021-08-07T18:35:03+5:302021-08-07T18:35:41+5:30
Electricity Amendment Bill : ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून हे विधेयक 'जनविरोधी' असल्याचे म्हटले आहे.

...तर वीज महाग होईल; कंपन्या नफा कमावतील; नव्या वीज विधेयकाविरोधात ममतांनी दंड थोपटला
कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, संसदेत चर्चेसाठी आणल्यागेलेल्या वीज (सुधारणा) विधेयकाविरोधात (Electricity Amendment Bill) मोर्चा उघडला आहे. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून हे विधेयक 'जनविरोधी' असल्याचे म्हटले आहे. तसेच यामुळे वीज महाग होईल आणि कंपन्या किंमत वाढवून नफा कमावतील, असेही म्हटले आहे. ममतांनी लिहिले, की "आमच्या आक्षेपाचा विचार न करता केंद्र पुन्हा हे विधेयक आणत आहे हे ऐकून धक्का बसला आहे." (CM mamata banerjee writes to pm narendra modi to re lodge protest against electricity amendment bill)
या विधेयकावर पुढे जाऊ नये, असे आवाहन करत, यावर आधी पारदर्शक चर्चा व्हायला हवी. तसेच राज्यांबरोबरही यावर चर्चा व्हावी, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर हे देशाच्या संघीय रचनेविरुद्ध आहे. तसेच, सेवा पुरवठादार वीजेचे दर वाढवतील आणि वीज महाग होईल, असेही ममतांनी म्हटले आहे.
बनावट सरकारी नोकरी घोटाळा; ममता बॅनर्जींना उच्च न्यायालयाचा मोठा झटका; दिला असा आदेश
ममता म्हणाल्या, "केंद्र सरकारने संसदेत निंदनीय वीज (सुधारणा) विधेयक, 2020 सादर केल्याच्या निषेधार्थ मी हे पत्र लिहित आहे. हे विधेयक गेल्या वर्षी मंजुरीसाठी सादर करण्यात आले होते. मात्र, आमच्या पैकी अनेकांनी यांतील जनतेच्या हिताचे नसलेले पैलू समोर आणले होते. मी 12 जून 2020 रोजीही एक पत्र लिहून या विधेयकातील कमतरतां आपल्या लक्षात आणून दिल्या आहेत.''