कुमारस्वामींनी षडयंत्र रचून मला 600 कोटींच्या घोटाळ्यात अडकवलं- जनार्दन रेड्डी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 18:49 IST2018-11-15T18:47:59+5:302018-11-15T18:49:14+5:30
600 कोटी रुपयांच्या पॉन्जी गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी जनार्दन रेड्डी यांना सशर्त जामीन देण्यात आला आहे.

कुमारस्वामींनी षडयंत्र रचून मला 600 कोटींच्या घोटाळ्यात अडकवलं- जनार्दन रेड्डी
बंगळुरू- 600 कोटी रुपयांच्या पॉन्जी गुंतवणूक घोटाळ्याप्रकरणी जनार्दन रेड्डी यांना सशर्त जामीन देण्यात आला आहे. त्यानंतर त्यांनी मीडियासमोर येत निरपराध असल्याचं म्हटलं आहे. या वेळी त्यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रेड्डीच्या माहितीनुसार, न्यायालयानं या पॉन्जी गुंतवणूक घोटाळ्यात माझा समावेश असल्याचं मान्य केलेलं नाही. ज्या पद्धतीनं मला अटक करण्यात आली. त्यावर न्यायाधीशांनीही नाराजी व्यक्त केली.
पॉन्जी गुंतवणूक घोटाळा प्रकरण लवकरच संपुष्टात येईल, पॉन्जी गुंतवणूक घोटाळ्याशी माझा कोणताही संबंध नाही. जे लोक मला संपवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांना हिशेब द्यावा लागेल. कुमारस्वामी यांनी 2006मध्ये 150 कोटींची लाच घेतल्याचा आरोप मी केला होता. कुमारस्वामी त्या आरोपाचा बदला घेण्यासाठीच मला 600 कोटी रुपयांच्या कथित पॉन्जी गुंतवणूक घोटाळ्यात गोवण्याचा प्रयत्न करत आहेत.
न्यायाधीशांच्या निष्पक्ष न्याय करण्याच्या कारणामुळेच मी बाहेर आहे. खरं तर माझा सेक्रेटरी अली खान याच्या पूर्ण परिवाराला एका कंपनीनं फसवलं आहे. आम्ही लोक गुन्हेगार नव्हे, तर पीडित आहोत. आम्ही पोलिसांत तक्रार करण्याचीही तयारी चालवली आहे. पोलिसांत तक्रार न केल्यास गुंतवणूकदारांचे पैसे परत करून असं एका व्यक्तीनं मला सांगितलं आहे.