शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला २ मंत्रिपदे मिळण्याची शक्यता; ठाकरेंना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2022 07:35 IST

२० जुलैला सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आमदारांच्या अपात्रेबद्दल सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत आहे. 

नवी दिल्ली - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. आमदारांपाठोपाठ आता खासदारांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या १९ पैकी १२ खासदार वेगळा गट बनवून शिंदे गटाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. लोकसभेतील या गटाचं नेतृत्व दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल शेवाळे करणार असून याबाबत आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देणार असल्याची माहिती आहे. 

शिंदे गटाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांच्या वेगळ्या गटासाठी मुख्य प्रतोद म्हणून यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांची निवड करण्यात आली आहे. शिंदे गटातील खासदारांना केंद्र सरकारमध्ये २ मंत्रिपदे मिळण्याचीही शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत असून समर्थक खासदारांसह ते पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. शिंदे गटातील खासदारांना केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात १ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्री पद मिळावं अशी मागणी करण्यात येत आहे. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वासोबत चर्चा करणार आहेत. महाराष्ट्रातील कॅबिनेट विस्ताराबाबत सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर निर्णय घेण्यात येईल. २० जुलैला सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आमदारांच्या अपात्रेबद्दल सुनावणी होणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्यात भाजपाशी जुळवून घ्यावं अशी मागणी केली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भावना गवळी यांना मुख्य प्रतोद या पदावरून काढलं. त्यानंतर त्या शिंदे गटात सहभागी झाल्या. तर शिंदे गटात सहभागी होणाऱ्या खासदारांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. राऊत म्हणाले की, लोकसभेत शिवसेना खासदार एकत्र आहेत. ज्याप्रमाणे आमदारांवर अपात्रेसाठी कारवाई केली गेली त्याप्रमाणे जर खासदार कुणी फुटला तर त्यांच्यावर कारवाई होईल. आम्ही कायदेशीर लढा देत आहोत. राजन विचारे यांना मुख्य प्रतोद नेमलं आहे असंही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा