शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय निती आयोगाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी केली महत्वाची मागणी; पंतप्रधानांचेही कानमंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 08:10 IST

निती आयोगाची बैठक

नवी दिल्ली :  तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी क्षेत्राचे अत्याधुनिकीकरण करावे, जेणेकरून भारत कृषिक्षेत्रात स्वयंपूर्ण होईल आणि जगाचे नेतृत्व करू शकेल. आयात कमी करून निर्यात वाढविण्यासाठी राज्यांनी व्यापार, पर्यटन आणि तंत्रज्ञानाला  ( ट्रेड, टुरिझम, टेक्नॉलॉजी-३ टी) चालना देण्यावर भर द्यावा, असेे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

निती आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सुलभ जीवनमान, पारदर्शक सेवा वितरण,  जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केल्यास दुर्बलतेऐवजी वेगवान शहरीकरण भारताची ताकद होईल. खाद्यतेलाच्या उत्पादनात भारताने स्वयंपूर्ण झाले पाहिजे. स्वयंपूर्ण होण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन आणि अन्न-प्रक्रिया क्षेत्र अत्याधुनिक करण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

सर्वव्यापी साथीपासून नियामक आयोगाची प्रत्यक्षात झालेली ही पहिलीच बैठक होय. या बैठकीला २३ मुख्यमंत्री, ३ नायब राज्यपाल, २ प्रशासक आणि केंद्रीय मंत्री उपस्थित होते. पीक विविधीकरण, डाळी, तेलबियाणे आणि अन्य कृषी मालात स्वयंपूर्णता,  शालेय आणि उच्च शिक्षणात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी तसेच नागरी शासन या चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बहिष्कार टाकला, तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे बैठकीला जाण्याचे टाळले.  

जीएसटी भरपाईचा अवधी पाच वर्षांसाठी वाढवावा - बघेल

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी  जीएसटी लागू केल्याने महसुलात तूट झाली असल्याने त्याच्या मोबदल्यात राज्यांना दिल्या जाणाऱ्या जीएसटी भरपाईचा अवधी पाच वर्षांसाठी वाढविण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी सांगितले की, राज्यघटनेच्या संघराज्य संरचनेविरुद्ध केंद्राने जाऊ नये. ओडिशावर विशेष लक्ष द्यावे आणि निधी देण्याची गरज आहे, असे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी बैठकीत सांगितले.

‘उत्पादनाच्या ५० टक्क्यांपर्यंत व्हावी हमीभावाने खरेदी’

किमान हमीभावाने सरकारद्वारे होणाऱ्या शेतमालाच्या खरेदीची मर्यादा एकूण उत्पादनाच्या ५० टक्क्यांपर्यंत वाढवावी, अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निती आयोगाच्या बैठकीत केली, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी केंद्राने पाठिंबा द्यावा, असेही शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेNarendra Modiनरेंद्र मोदीFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtraमहाराष्ट्र