CM देवेंद्र फडणवीसांचे पानिपतमधील शौर्यभूमीला वंदन; म्हणाले, “माझे सौभाग्य, इथे येत राहीन”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 15:54 IST2025-01-14T15:51:27+5:302025-01-14T15:54:41+5:30

CM Devendra Fadnavis Panipat News: यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर शौर्यदिनी पानिपतला येणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आहेत, असे सांगितले जात आहे.

cm devendra fadnavis pays salute to the land of bravery in panipat | CM देवेंद्र फडणवीसांचे पानिपतमधील शौर्यभूमीला वंदन; म्हणाले, “माझे सौभाग्य, इथे येत राहीन”

CM देवेंद्र फडणवीसांचे पानिपतमधील शौर्यभूमीला वंदन; म्हणाले, “माझे सौभाग्य, इथे येत राहीन”

CM Devendra Fadnavis Panipat News: कौरव–पांडव संगरतांडव द्वापारकाली होय अती। तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती।। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानिपत, हरियाणा येथे पानिपत शौर्य स्मारकास भेट दिली. यावेळी त्यांनी स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शूरवीरांना विनम्र अभिवादन केले आणि आदरांजली वाहिली. यावेळी उपस्थितांना संबोधित केले. तसेच पत्रकारांच्या प्रश्नांनाही सविस्तरपणे उत्तरे दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यात अठरापगड जाती एकत्र होत्या. लोक एकत्र येऊन मावळे म्हणून लढले. त्यांनी स्वराज्य विस्तारीकरणाच काम केले. आम्ही एकत्र राहिलो, तर सुरक्षित आहोत. पुन्हा जाती-पातीमध्ये विभाजन झाले, तर प्रगती करता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी भगव्या झेंड्याखाली आम्हाला सर्वांना एकत्र आणले आणि भारताच्या तिरंग्याखाली एकत्र येणे गरजेच आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पानिपतमधील शौर्यभूमीला वंदन

यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर पानिपतला येणारे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री आहेत. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मंगल भूमीला वंदन करण्यासाठी येणे हे माझे सौभाग्य मानतो. जेव्हा संधी मिळेल, इथे येत राहीन. आम्ही शौर्य भूमीला वंदन करण्यासाठी आलो. शौर्य भूमीच्या ट्रस्टचे मनापासून आभार मानतो. आमचा इतिहास जिवंत ठेवण्याच काम त्यांनी केले, याबाबत त्यांचे अभिनंदन करतो. या ठिकाणी मातृभूमीकरिता धारातीर्थी पडलेल्या मराठ्यांच्या शौर्याच संवर्धन करण्याच काम ट्रस्ट करत आहे. ट्रस्टसोबत माझी चर्चा झाली आहे. काही गोष्टी त्यांनी लक्षात आणून दिल्या आहेत. येथील स्मारक अधिक चांगल्या पद्धतीने कसे करता येईल, त्यासाठी जे आवश्यक असेल, त्यात महाराष्ट्र सरकार पुढाकार घेईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, पानिपत ही मराठी माणसाची एक भळभळती जखम आहे. त्याचवेळी पानिपत मराठी माणसाचा अभिमान आहे. ज्या प्रकारे मराठ्यांनी पानिपतच्या युद्धात शौर्य दाखवले, अतिशय विपरित परिस्थितीत मराठे लढले. युद्धाच्या इतिहासातील अत्यंत मोठी अशा प्रकारची गोष्ट पहायला मिळते. या शौर्यानंतर आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर अनेक आमचे मराठे सैनिक वीरगतीला प्राप्त झाल्यानंतर मराठ्यांनी हार मानली नाही. ही मराठ्यांची वीरता आहे, शौर्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते हिंदवी स्वराज्य छत्रपतींच्या आशिर्वादने संपूर्ण भारतात पसरवण्याचे काम मराठ्यांनी केले. पानिपत एक अशा प्रकारची लढाई आहे, त्यात जरी तांत्रिकदृष्टया पराजय झाला असला, तरी मराठी हरले नाहीत. त्यांनी आपले शौर्य सातत्याने इतके वाढवलं की, त्यानंतर भारतावर अशा प्रकारे आक्रमण करण्याची हिंमत कोणाची झाली नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
 

Web Title: cm devendra fadnavis pays salute to the land of bravery in panipat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.