शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीवारी टाळली का? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:25 IST

CM Devendra Fadnavis News: मंत्रीपद वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. प्रत्येक विभागातून कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कुणाला मंत्री बनवू शकतो अशी एक यादी आम्ही तयार केली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

CM Devendra Fadnavis News:देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. परंतु, अद्यापही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीचा निर्णय झालेला दिसत नाही. यावरून महाविकास आघाडीतील नेते टीका करताना पाहायला मिळत आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्ली दौऱ्यावर गेले आहे. परंतु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र गेलेले नाहीत. यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

विशेष विधिमंडळाचे कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्ली गाठली. तर काही वेळाने भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेही दिल्लीत गेले. महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप अंतिम करण्यासाठी नेते दिल्लीत गेल्याची चर्चा होती. परंतु, एकनाथ शिंदे दिल्लीला न गेल्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. एकनाथ शिंदेंची नाराजी अजून दूर झाली नाही का, गृहखाते आणि अपेक्षित मंत्रि‍पदे मिळण्याची शक्यता धुसर झाली आहे का, महायुतीत सगळे आलबेल नाही, अशा नाना चर्चा आणि शक्यतांना पेव्ह फुटले होते. दिल्लीत पत्रकारांशी बोलातना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.

अजित पवार आणि तुम्ही दिल्लीत असताना एकनाथ शिंदे सोबत का आले नाही?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कोणताही तिढा नाही. अजित पवार त्यांच्या कामानिमित्त दिल्लीत आले आहेत. मी माझ्या कामानिमित्त आलो आहे. एकनाथ शिंदेंचे लगेच इथे काही काम नसल्यामुळे आलेले नाहीत. त्यामुळे ते मुंबईत आहेत, आम्ही दिल्लीत आहोत अशा चर्चांमध्ये अर्थ नाही. माझी आणि अजित पवारांची दिल्लीत भेट झालेली नाही. मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलो आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय आमचे संसदीय मंडळ, नेते घेतात. चंद्रशेखर बावनकुळे आणि मी आमच्या नेत्यांची भेट घेतली. मंत्रिपदांबाबत चर्चाही केली आहे. प्रत्येक विभागातून कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कुणाला आपण मंत्री बनवू शकतो अशी एक यादी आम्ही तयार केली आहे. आता वरीष्ठ स्तरावर ते निर्णय घेतील आणि आम्हाला कळवतील. मंत्रीपद वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. तुम्हाला लवकरच कळेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुती