शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Punjab Election 2022: चरणजीत सिंग चन्नी 'या' दोन जागांवर लढणार? काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी उद्या जाहीर होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 15:11 IST

Punjab Election 2022: उद्या (बुधवारी) काँग्रेस पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे समजते. या यादीत मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचेही नाव असू शकते.

चंदीगड : पंजाब विधानसभेच्या निवडणुकीबाबत (Punjab Assembly Election) एक मोठी बातमी आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी दोन जागांवर निवडणूक लढवू शकतात. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी  पंजाबमधील चमकौर साहिब आणि आदमपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी सध्या चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.

दरम्यान, उद्या (बुधवारी) काँग्रेस पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार असल्याचे समजते. या यादीत मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचेही नाव असू शकते. निवडणूक आयोगाने पंजाबसह पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. पंजाबमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पंजाबमध्ये 14 फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

दरम्यान, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषद घेतली. नवज्योतसिंग म्हणाले की, पंजाबमध्ये आता काँग्रेस मॉडेल चालवले जाईल. माफिया मॉडेल यापुढे चालणार नाही. पंजाबमध्ये सर्व प्रकारचे खाणकाम केले जाते. आतापर्यंत माफिया राजवट सुरू होती. माफियांनी सरकारची धोरणेही राबवू दिली नाहीत.

याचबरोबर, पंजाबमध्ये वाळू-माफियांची दहशत होती. त्यामुळे वाळूचे दर ठरवावे लागतील. जेव्हा प्रत्येक गोष्टीची किंमत ठरलेली असते तेव्हा वाळूचीही असायला हवी. वाळूचे दर ठरवले असते तर प्रश्नच नव्हता. वाळू डिलिव्हरीसाठी ऑनलाइन बुकिंग असावे, असे नवज्योतसिंग सिद्धू यांनी सांगितले. 

टॅग्स :Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPunjabपंजाब