"तुम्ही १०० ते १००० रुपयांपर्यंत देणगी देऊ शकता, मला ४० लाखांची गरज आहे"
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 11:56 IST2025-01-12T11:54:58+5:302025-01-12T11:56:30+5:30
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी लोकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे.

"तुम्ही १०० ते १००० रुपयांपर्यंत देणगी देऊ शकता, मला ४० लाखांची गरज आहे"
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी लोकांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे. आतिशी म्हणाल्या की, "निवडणूक लढवण्यासाठी आपल्याला क्राउड फंडिंगची आवश्यकता आहे. निवडणूक लढवण्यासाठी मला ४० लाख रुपयांची आवश्यकता आहे. लोक आम्हाला १०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत मदत करू शकतात. जे आम्हाला निवडणूक लढवण्यासाठी उपयुक्त ठरतील."
आतिशी यांनी लोकांना आवाहन केलं आणि सांगितलं की, दिल्लीतील जनतेने 'आप'ला पाठिंबा दिला आहे आणि निवडणूक लढवण्यासाठी आम्हाला देणग्या दिल्या आहेत. लोकांच्या छोट्याशा देणग्यांमुळे आम्हाला निवडणूक लढवण्यास आणि जिंकण्यास मदत झाली आहे. दिल्लीतील सर्वात गरीब लोकांनी आम्हाला १० ते १०० रुपयांपर्यंत थोडे थोडे पैसे देऊन मदत केली आहे. देशभरातून लोकांनी आम्हाला देणगी दिली आहे.
त्यांनी असंही म्हटलं की, 'आप'चे राजकारण सकारात्मक होतं की, आम्ही कॉर्पोरेट किंवा भांडवलदारांकडून पैसे मागितले नाहीत. सर्वात मोठी समस्या अशी आहे की, उमेदवार आणि पक्ष मोठ्या दिग्गजांकडून निधी घेतात आणि नंतर त्यांच्यासाठी काम करतात आणि कराराच्या स्वरूपात पैसे मिळवतात. केजरीवाल सरकारने सामान्य लोकांसाठी काम केलं कारण ते आम्हाला लढण्यास मदत करतात. जर आपण मोठ्या लोकांकडून पैसे घेतले असते तर आपण मोफत पाणी, वीज, दवाखाने आणि शिक्षण देऊ शकलो नसतो.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, मला निवडणूक लढवण्यासाठी पुरेसा निधी हवा आहे. निवडणूक लढवण्यासाठी मला ४० लाख रुपयांची आवश्यकता आहे आणि मी लोकांना आवाहन करते की, त्यांनी आम्हाला १०० ते १००० रुपयांपर्यंतची रक्कम द्यावी, ज्यामुळे आम्हाला निवडणूक लढवण्यास मदत होईल. एखाद्या मुख्यमंत्र्यांनी बेकायदेशीर मार्गाने एवढी छोटी रक्कम गोळा करणे ही मोठी गोष्ट नाही. जर आपण ते चुकीच्या मार्गाने गोळा केले तर एक दिवसही लागणार नाही, परंतु जर भ्रष्ट मार्गांनी पैसे घेतले तर पायाभूत सुविधा ढासळेल.