शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीपूर्वी हनुमान भक्तीत तल्लीन झाले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 17:15 IST

लोकसभा निवडणुकीपूर्वी AAP ने दिल्लीत सुंदरकांड आणि हनुमान चालिसा पठणाचे आयोजन केले आहे.

नवी दिल्ली: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख जवळ आली आहे, त्यामुळे अवघा देश राममय झाला आहे. अशातच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीने राजधानी दिल्लीत सुंदरकांड पाठाचे आयोजन केले आहे. स्वतः सीएम केजरीवाल आपल्या पत्नीसह रोहिणी येथील प्राचीन श्री बालाजी मंदिरात पोहचले आणि सुंदरकांड पाठत सहभागी झाले.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी संपूर्ण दिल्लीत सुंदरकांड आणि हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, अशी घोषणा आम आदमी पक्षाने 15 जानेवारी रोजी केली होती. त्यानुसार, हा उपक्रम आज(दि.16 जानेवारी) पासून सुरू झाला आहे. यानुसार, दिल्लीतील सर्व विधानसभांमध्ये सुंदरकांड आयोजित केला जाईल. पक्षाच्या निवेदनानुसार, आमदार आणि नगरसेवक प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सुंदरकांड आयोजित करतील. 

राम मंदिरावरुन देशात राजकारण 22 जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटनावरुन देशात राजकारण सुरू झाले आहे. भारतीय जनता पक्ष या मुद्द्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस आणि आपसह विरोधी पक्षांनी केला आहे. अशातच राम मंदिराच्या मुद्द्यावर भाजप मागे पडण्याच्या भीतीने आम आदमी पक्षाने सुंदरकांड आणि हनुमान चालिसा पठणाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.

'आप'च्या आयोजनावर भाजपची टीकादिल्लीतील आपने आयोजित केलेल्या सुंदरकांड पाठावर भाजपचे प्रवक्ते बन्सुरी स्वराज यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. ते म्हणाले की, निवडणुकीपूर्वीच अरविंद केजरीवाल यांना प्रभू राम आणि सुंदरकांड आठवतो. यापूर्वीही त्यांनी एमसीडी निवडणुकीपूर्वी सुंदरकांड पठण करण्याची घोषणा केली होती आणि आता ते लोकसभा निवडणुकीपूर्वी सुंदरकांड पठण करत आहेत, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारण