शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election Results: केजरीवालांकडून विशेष सूचना; आप कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचा संदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 11:01 IST

Delhi Assembly Election Results Updates: निवडणूक निकालाआधी अरविंद केजरीवालांचं कार्यकर्त्यांना आवाहन

नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पार्टीनं मुसंडी मारली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा एकदा केजरीवाल सरकार येण्याची दाट शक्यता आहे. तत्पूर्वी काल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्ष कार्यकर्त्यांना महत्त्वाची सूचना दिली. निवडणूक विजयानंतर फटाके फोडू नका, असं आवाहन केजरीवालांनी केलं आहे. दिल्लीतलं प्रदूषण वाढू नये, यासाठी केजरीवालांनी आपच्या कार्यकर्त्यांना ही सूचना केली आहे. दिल्लीत पुन्हा एकदा आपचं सरकार येणार असल्याचा विश्वास असल्यानं पक्षाच्या कार्यकर्त्यांना विजयोत्सव साजरा करण्याची तयारी केली आहे. आपच्या मुख्यालयातून मिठाईची ऑर्डर देण्यात आली आहे. सर्वच एक्झिट पोल्सनी दिल्लीत आपचंच सरकार कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात होताच आपनं मोठी मुसंडी मारली. सध्या आप ५० जागांवर पुढे असून भाजपानं २० मतदारसंघात आघाडी घेतली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपनं तब्बल ६७ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे याआधी केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी ते काँग्रेसच्या पाठिंब्यानं सरकार चालवत होते. त्यानंतर निवडणुकीला सामोरं जात आपनं दणदणीत बहुमत मिळवत सरकार स्थापन केलं. आपच्या लाटेत भाजपाचा पालापोचाळा झाला. या निवडणुकीत भाजपाला केवळ तीन जागा मिळाल्या. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.  

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाcongressकाँग्रेस