शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 09:01 IST

Uttarakhand Uttarkashi Cloudburst News: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये ढगफुटी झाली. आठ ते नऊ कामगार बेपत्ता झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

उत्तराखंडमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. उत्तरकाशीमध्ये यमुनोत्री महामार्गावर पालीगाड ओजरी डाबरकोट दरम्यान ढगफुटी झाल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ८ ते ९ कामगार बेपत्ता झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय, यमुनोत्री मार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ, पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदत कार्य सुरुवात केली आहे.

ही घटना मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील उत्तरकाशीमध्ये गेल्या दोन तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे. शनिवारी रात्री उशीरा यमुनोत्री महामार्गावर पालीगाड ओजरी डाबरकोट दरम्यान ढगफुटी झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर एसडीआरएफ, पोलिस आणि महसूल विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. चौकशीदरम्यान, आठ ते नऊ कामगार बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली असून त्यांचा शोध सुरू आहे.

आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद कुमार सुमन म्हणाले की, "घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. १५ लोक बचाव कार्यात गुंतले आहेत. घटनास्थळी मशीन्स पोहोचू शकत नसल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण होत आहे. संबंधित कामगार एकतर ढिगाऱ्यात अडकले आहेत किंवा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले आहेत, त्यांचा शोध सुरू आहे", असे ते म्हणाले.

ढगफुटीच्या घटनेनंतर यमुनोत्री महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे पथक रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न करत आहेत. शिवाय, ओझरीजवळचा रस्ता पूर्णपणे वाहून गेल्याने नागरिकांचा संपर्क तुटला आहे. शेताचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच यमुना नदीच्या पातळीत वाढ झाली असून स्यानायट्टी येथील कुपडा कुंशाला त्रिखिली मोटर पूलही धोक्यात आला आहे. 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. येत्या १ जुलैपर्यंत देहारादूनसह टिहरी, पौडी, चंपावत, हरिद्वार, नैनिताल आणि उधमसिंह नगर जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

टॅग्स :RainपाऊसUttarakhandउत्तराखंड