उत्तराखंडमध्ये ढगफुटी; राजस्थानात पूर, तामिळनाडूतही अनेक भागांत वृष्टी, वस्त्यांत पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 06:15 IST2025-08-24T06:14:20+5:302025-08-24T06:15:06+5:30

Cloudburst in Uttarakhand : उत्तर भारतात सुरू असलेल्या पावसाचा जोर थोडा कमी झाला असला, तरी उत्तराखंडसह काही राज्यांत शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या पावसामुळे पूरस्थिती तसेच दुर्घटनांमुळे मालमत्ता व जीवितहानी झाली आहे.

Cloudburst in Uttarakhand; Floods in Rajasthan, rain in many parts of Tamil Nadu, water in settlements | उत्तराखंडमध्ये ढगफुटी; राजस्थानात पूर, तामिळनाडूतही अनेक भागांत वृष्टी, वस्त्यांत पाणी

उत्तराखंडमध्ये ढगफुटी; राजस्थानात पूर, तामिळनाडूतही अनेक भागांत वृष्टी, वस्त्यांत पाणी

नवी दिल्ली/चेन्नई -  उत्तर भारतात सुरू असलेल्या पावसाचा जोर थोडा कमी झाला असला, तरी उत्तराखंडसह काही राज्यांत शुक्रवारी रात्रीपासून पडलेल्या पावसामुळे पूरस्थिती तसेच दुर्घटनांमुळे मालमत्ता व जीवितहानी झाली आहे. राजस्थानातही अनेक जिल्ह्यांत जनजीवन विस्कळीत झाले आहे.

उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात थराली येथे ढगफुटीसदृश पावसामुळे नाल्यांना आलेल्या पुरात बाजारपेठेतील अनेक दुकाने व घरांमध्ये गाळ भरला. यात एका तरुणीचा मृत्यू झाला असून, एकजण बेपत्ता आहे. दरम्यान, हिमाचल प्रदेशात पावसामुळे ३३९ रस्ते मार्ग बंद झाले आहेत.

महामार्ग बंद, शाळांना सुट्टी
चमोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या म्हणण्यानुसार, मिंग गधेराजवळ ढिगाऱ्यांमुळे थरालीला जोडणारा कर्णप्रयाग-ग्वालदम राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. तर सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

तामिळनाडूत एकाचा मृत्यू
या राज्यातील अनेक जिल्ह्यांत शनि वारी मुसळधार पाऊस झाला. चेन्नईत विजेच्या धक्क्याने एका स्वच्छता कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्रभर पडलेल्या पावसामुळे चेन्नईत अनेक वस्त्यांत पाणी शिरले आहे.

काश्मीरमध्ये दोन ठार
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनांत दोघांचा मृत्यू झाला. तर एका बस अपघातात २० जण जखमी झाले आहेत. कठुआमध्ये दुथडी भरून वाहणाऱ्या नदीत कार वाहून गेल्याने एकाचा मृत्यू झाला. 

Web Title: Cloudburst in Uttarakhand; Floods in Rajasthan, rain in many parts of Tamil Nadu, water in settlements

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.