सिक्कीममध्ये ढगफुटी, तीस्ता नदीला पूर; २३ जवान बेपत्ता, पाण्याची पातळी २० फुटांवर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 09:45 AM2023-10-04T09:45:17+5:302023-10-04T09:51:46+5:30

उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावावर अचानक ढग फुटल्याने लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीला अचानक पूर आला.

Cloudburst in Sikkim, Teesta river floods; 23 jawans washed away, water level at 20 feet | सिक्कीममध्ये ढगफुटी, तीस्ता नदीला पूर; २३ जवान बेपत्ता, पाण्याची पातळी २० फुटांवर

सिक्कीममध्ये ढगफुटी, तीस्ता नदीला पूर; २३ जवान बेपत्ता, पाण्याची पातळी २० फुटांवर

googlenewsNext

नवी दिल्ली: उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावावर अचानक ढगफुटी झाल्याने लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीला अचानक पूर आला. यामुळे भारतीय लष्कराचे २३ जवान बेपत्ता झाले आहेत. सिक्कीममध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने खालच्या प्रवाहातील पाण्याची पातळी अचानक १५-२० फुटांपर्यंत वाढली. त्यामुळे सिंगतामजवळील बारडांग येथे उभ्या असलेल्या लष्कराच्या वाहनांचे हाल झाले आहेत. यामध्ये २३ जवान बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर तातडीने शोधमोहिम सुरु करण्यात आली आहे. 

तीस्ता नदीला अचानक पूर आला

संरक्षण पीआरओच्या म्हणण्यानुसार, उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावावर अचानक ढग फुटल्याने लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीला अचानक पूर आला. खोऱ्यातील काही लष्करी आस्थापना प्रभावित झाल्या आहेत. सध्या २३ जवान बेपत्ता असून काही वाहने चिखलात दबल्याचे वृत्त आहे.

पाण्याची पातळी अचानक १५-२० फुटांपर्यंत वाढली

डिफेन्स पीआरओच्या म्हणण्यानुसार, चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने डाउनस्ट्रीममधील पाण्याची पातळी अचानक १५-२० फुटांपर्यंत वाढली. त्यामुळे सिंगतामजवळील बारडांग येथे उभ्या असलेल्या लष्कराच्या वाहनांची कोंडी झाली.

मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला

दरम्यान, मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी सिंगताम येथील परिस्थितीचा आढावा घेतला. भाजप नेते उग्येन त्सेरिंग ग्यात्सो भुतिया म्हणाले की सिंगताममध्ये कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाली नाही, परंतु सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. काही लोक बेपत्ता झाल्याचीही माहिती आहे. त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Cloudburst in Sikkim, Teesta river floods; 23 jawans washed away, water level at 20 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.