भाववाढीचा झटका! कपडे, उपकरणे महागणार; किमती ८ ते १० टक्के वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2021 07:15 AM2021-11-13T07:15:55+5:302021-11-13T07:16:09+5:30

उत्पादन खर्च वाढल्याच्या परिणाम

Clothing, equipment will become more expensive; Prices will increase by 8 to 10 percent | भाववाढीचा झटका! कपडे, उपकरणे महागणार; किमती ८ ते १० टक्के वाढणार

भाववाढीचा झटका! कपडे, उपकरणे महागणार; किमती ८ ते १० टक्के वाढणार

Next

नवी दिल्ली : इंधन दरवाढीचा सर्वसामान्यांना आणखी फटका बसेल. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने कपडे, टीव्ही, फ्रिज, मद्य, साैंदर्य प्रसाधनांसह दैनंदिन वापराच्या वस्तू ८ ते १० टक्क्यांनी महागणार आहेत. काही महिन्यांमध्ये डिझेलच्या दरांमध्ये माेठी वाढ झाली हाेती. इंधन दरवाढीमुळे पुरवठा साखळीवर माेठा परिणाम झाला हाेता. माल वाहतुकीचा खर्च वाढला हाेता.

परिणामी महागाईमध्ये वाढ झालेली आहे. आता दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंच्या किमती ८ ते १० टक्क्यांनी वाढणार आहे. कपडे, टीव्ही, फ्रिज, साैंदर्य प्रसाधने तसेच इतर इलेक्ट्राॅनिक्स वस्तूंचा यात समावेश आहे. किरणा, पॅकबंद खाद्यपदार्थ, पर्सनल केअर उत्पादने यासारख्या वस्तुंच्या किमती यापूर्वीच वाढलेल्या आहेत.

मालवाहतुकीचा खर्च वाढला

इंधन दरवाढीचाही यावर परिणाम झाला. सप्टेंबरमध्ये इंधन आणि उर्जा विषयक महागाई २४.८ टक्के हाेती. त्यातच लाॅजिस्टिक आणि वेअर हाउसिंगचाही खर्च वाढला आहे. मालवाहतुकीचे भाडे उच्चांकी पातळीवर हाेते. त्यामुळे किमती वाढविण्याशिवाय पर्याय नसल्याचे कंपन्यांचे म्हणणे आहे.

कच्चा माल महागला

काच, कापूस, स्टील, इलेक्ट्राॅनिक चिप तसेच आवश्यक रासायनिक कच्चा माल अतिशय महाग झाला आहे. सुती धाग्याच्या किंमती गेल्या वर्षीच्या तुलनेत ६० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे कापड उद्याेगाला माेठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे.

घाऊक महागाई वाढली

गेल्या सहा महिन्यांमध्ये घाऊक महागाईचा दर वाढलेला आहे. किरकाेळ महागाई कमी झालेली आहे. तरीही थाेक महागाईमुळे किमतीत वाढ करण्यात येणार आहे. कंपन्यांच्या वाढलेल्या उत्पादन खर्चाचा अंदाज थाेक महागाईवरून येताे.

मागणीवर परिणाम

उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांकडून उत्पादनांच्या किमतीत वाढ करण्यात येणार आहे. दसरा, दिवाळी, छठ पूजा इत्यादी सणासुदीच्या दिवसांमध्ये यावेळी माेठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात येत आहे. त्यातच किमती वाढल्यास मागणीवर परिणाम हाेण्याची शक्यता आहे.

Web Title: Clothing, equipment will become more expensive; Prices will increase by 8 to 10 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.