हा हुशार कुत्रा करतो माझे टि्वट - राहुल गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:07 IST2017-10-30T03:01:42+5:302017-10-30T23:07:12+5:30

राहुल गांधी यांनी टि्वटरवर, रिटि्वटसवर, आणि त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येवर शंका घेणा-या टीकाकारांची चांगली फिरकी घेतली.

This clever dog is my thorn - Rahul Gandhi | हा हुशार कुत्रा करतो माझे टि्वट - राहुल गांधी

हा हुशार कुत्रा करतो माझे टि्वट - राहुल गांधी

नवी दिल्ली : राहुल गांधी यांनी टि्वटरवर, रिटि्वटसवर, आणि त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येवर शंका घेणा-या टीकाकारांची चांगली फिरकी घेतली. माझे टि्वट माझा हुशार कुत्रा करतो, तो तरी किमान प्रामाणिक आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सोशल मीडियातील सक्रीयतेवर शंका घेणा-यांना त्यांनी चपखल उत्तर दिले आहे. ‘पिडी’ नावाच्या लोभस कुत्र्याचा व्हिडिओ टाकून तोच आपले व्टिटर संदेश लिहित असल्याचा टोमणा मारला आहे. या व्हिडिओसोबत राहुल गांधी यांनी लिहिले आहे की, त्यांच्यासाठी (राहुल गांधी) कोण व्टिट करत आहे? तो मी आहे ‘पीडी’ जो यांच्यापेक्षा (राहुल गांधी) कूल आहे. पाहा मी व्टिटच्या माध्यमातून ...नव्हे, ट्रिटच्या माध्यमातून काय केले आहे.

हा १४ सेकंदांचा व्हिडिओ आहे. यात सुरुवातील या कुत्र्याला ‘नमस्ते’ करायला लावून त्याला बिस्किटासारखे काही खाऊ घातले जाते. राहुल गांधी यांचा हा व्हिडिओ पाच तासात ५००० पेक्षा अधिक वेळा रिव्टिट झाला आहे. तर, १२ हजारांपेक्षा अधिक लाईक्स आहेत.
राहुल गांधी यांच्या टि्वटला अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने रिटि्वट मिळत आहेत. त्यानंतर राजकीय वर्तुळातून असा आरोप होत आहे की, राहुल गांधी यांचे अकाउंट अन्य कोणी चालवित आहे. त्यांचे फॉलोअर्स बनावट आहेत.

Web Title: This clever dog is my thorn - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.