Coronavirus: मोबाईल वापरता? मग कोरोनापासून जरा जास्तच सावध राहा; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2020 14:32 IST2020-03-04T14:28:34+5:302020-03-04T14:32:47+5:30

Coronavirus मोबाईलच्या स्क्रीनवर आठवडाभर जिवंत राहतो कोरोनाचा विषाणू

Clean your phone twice a day to prevent the spread of coronavirus kkg | Coronavirus: मोबाईल वापरता? मग कोरोनापासून जरा जास्तच सावध राहा; कारण...

Coronavirus: मोबाईल वापरता? मग कोरोनापासून जरा जास्तच सावध राहा; कारण...

ठळक मुद्देस्मार्टफोनच्या स्क्रीनवर सात दिवस जिवंत राहू शकतो कोरोना व्हायरसस्मार्टफोन वापरुन झाल्यावर चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याचा सल्लास्मार्टफोनची स्क्रीन अल्कोहोल वाईप्सनं पुसल्यास टळू शकतो धोका

सध्या जगभरात कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे आतापर्यंत ३ हजारहून अधिक जणांनी प्राण गमावले आहेत. भारतात २५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. चीन, इराण, दक्षिण कोरियामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पार्श्वभूमीवर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून भारतात येणाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करुनच त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

स्मार्टफोनचा वापर करणाऱ्यांना कोरोना विषाणूचा धोका असल्याचं इंग्लंडमधल्या साऊथप्टन विद्यापीठातले प्राध्यापक विल्यिम कीविल यांनी सांगितलं. स्मार्टफोनचा वापर केल्यावर चेहऱ्याला स्पर्श करण्यापूर्वी हात व्यवस्थित धुवा. कारण स्मार्टफोनच्या स्क्रीनवरही कोरोना विषाणू असू शकतो, अशी माहिती कीविल यांनी दिली. निर्जीव पृष्ठभागावर कोरोना विषाणू जवळपास एक आठवडाभर जिवंत राहू शकतो. मानवी शरीरातून शिंक किंवा कफच्या रुपात तो बाहेर येतो. कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीच्या थेट संपर्कात आल्यास त्याचा संसर्ग होण्याची शक्यता वाढते, असं त्यांनी सांगितलं. 

स्टील आणि तांब्याच्या पृष्ठभागावर कोरोनाचा विषाणू २ तासांपर्यंत जिवंत राहतो, अशी माहिती अमेरिकेतल्या आजार नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राकडून (सीडीसी) देण्यात आली आहे. कार्डबोर्ड आणि प्लास्टिकवर हा विषाणू बराच काळ तग धरतो. मानवी शरीराच्या बाहेर ९ दिवस कोरोनाचा विषाणू जिवंत राहू शकतो. अल्कोहोल वाईप्सनं स्मार्टफोनची स्क्रीन स्वच्छ केल्यास कोरोनाचा विषाणू मरतो. या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी सॅनिटायझरनं हात धुवावेत, असा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातल्या जाणकारांनी दिला आहे. 

जगातल्या बहुतांश देशांमध्ये कोरोना विषाणूची दहशत पाहायला मिळते आहे. आतापर्यंत ९२ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ३ हजार ११० जणांचा मृत्यू झाला आहे. यातले २९०० हून अधिक जण चीनमधले आहेत. 
 

Web Title: Clean your phone twice a day to prevent the spread of coronavirus kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.