शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! फी भरली नसल्याने दिवसभर वर्गाबाहेर उभं केलं; विद्यार्थिनीने टोकाचं पाऊल उचललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 14:59 IST

शाळेची फी भरू शकत नसल्यामुळे मुलीला परीक्षेला बसू न दिल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी केला.

गुजरातमधील सुरतमध्ये आठवीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेची फी भरू शकत नसल्यामुळे तिला परीक्षेला बसू न दिल्याचा आरोप विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी केला. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. न्यू इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, कुटुंबाचा असा दावा आहे की शाळेने मुलीला दिवसभर वर्गाबाहेर उभं करून शिक्षा केली, ज्यामुळे ती अस्वस्थ झाली आणि घाबरली. त्यानंतर तिने शाळेत जाणं बंद केलं. २१ जानेवारी रोजी तिचे आईवडील कामावर असताना तिने आत्महत्या केली.

मुलीचे वडील राजू खटीक म्हणाले, माझ्या मुलीला शाळेत परीक्षेला बसू दिलं गेलं नाही, तिला वर्गाबाहेर उभं केलं गेलं. घरी आल्यावर ती खूप रडत होती आणि मला सांगितलं की, फी न भरल्यामुळे तिला परिक्षेला बसू दिलं नाही. मी तिला सांगितलं की, मी पुढच्या महिन्यात फी भरेन. या घटनेनंतर मुलीने शाळेत जाण्यास नकार दिला.

शाळेने मात्र कुटुंबीयांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. आम्हाला आज सकाळीच या घटनेची माहिती मिळाली. शाळेचा या घटनेशी काहीही संबंध नाही आणि फीमुळे तिने आत्महत्या केली असा दावा करणं चुकीचं आहे. शाळा विद्यार्थ्यांना फीबद्दल माहिती देत ​​नाही. ती पालकांना याबाबत सांगते. आम्ही त्यांना फी भरण्यासाठी तारीख देतो असं शाळा प्रशासनाने म्हटलं आहे. 

शाळेतील शिक्षिका रंजनबेन अहिर यांनीही या विषयावर आपलं मत व्यक्त केलं. त्या म्हणाल्या "८ तारखेला मी विद्यार्थिनीला सांगितलं की तिची फी भरलेली नाही. आम्ही तिच्या पालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी फोन उचलला नाही. तिने मला पुन्हा फोन करायला सांगितलं, म्हणून मी फोन केला, पण तरीही तो फोन उचलला नाही. मी तिला परीक्षा देण्यास सांगितलं आणि तिने परीक्षा दिली." पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :SchoolशाळाTeacherशिक्षक