शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

गोहत्येच्या संशयावरून उत्तर प्रदेशात तणाव, हिंसाचारात पोलीस इन्स्पेक्टरचा मृत्यू  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 16:30 IST

कथित गोरक्षकांनी उत्तर प्रदेशामध्ये पुन्हा डोके वर काढले असून, राज्यातील बुलंदशहर जिह्ल्यामध्ये गोहत्येच्या संशवावरून हिंसाचार उसळला.

ठळक मुद्दे कथित गोरक्षकांनी उत्तर प्रदेशामध्ये पुन्हा डोके वर काढले बुलंदशहर जिह्ल्यामध्ये गोहत्येच्या संशवावरून हिंसाचार उसळला. हिंसक जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणावर मोडतोड आणि वाहनांची जाळपोळ केली. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला

बुलंदशहर - कथित गोरक्षकांनी उत्तर प्रदेशामध्ये पुन्हा डोके वर काढले असून, राज्यातील बुलंदशहर जिह्ल्यामध्ये गोहत्येच्या संशवावरून हिंसाचार उसळला. यावेळी हिंसक जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणावर मोडतोड आणि वाहनांची जाळपोळ केली. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. यादरम्यान, हिंसक जमावाला रोखताना स्याना पोलीस ठाण्याचे पोलीस इन्स्पेक्टर सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला. या प्रकारानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुलंदशहर जिल्ह्यातील स्यानामधील एका गावात शेतात गोवंश आढळला होता. त्यानंतर संतप्त झालेल्या लोकांनी रास्ता रोको केला. त्यावेळी पोलीस आणि जमावामध्ये वादावादी झाली. पोलिसांनी आंदोलनकर्त्या जमावावर गोळीबार केला. यात एक तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर संतप्त जमावाने पोलीस ठाण्यावर हल्ला केला. तसेच मोठ्या प्रमाणावर मोडतोड आणि जाळपोळ केली. यात पोलीस अधिकारी सुबोध कुमार सिंह गंभीर जखमी झाले. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  

 या प्रकारानंतर घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच बुलंदशहर येथील बिघडलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मीरतचे एडीजी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळावरील परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे.  

टॅग्स :cow vigilantesगोरक्षकांचा हिंसाचारUttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी