शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

सर्वेक्षणात खडक असल्याचा दावा, बांधकाम करताना आढळले मातीचे डोंगर; नेमकं प्रकरण काय?, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 08:02 IST

Silkyara Tunnel: सिलक्यारा बोगदा बांधण्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात येथे कठीण खडक असल्याचा दावा करण्यात आला होता.

उत्तरकाशी: उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यातून ४१ कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर एका दिवसानंतर ही जागा पूर्णपणे निर्जन दिसली. तेथे अक्षरश: सन्नाटा होता. दरम्यान, एम्स-ऋषिकेशच्या डॉक्टरांनी सर्व कामगारांची तपासणी करून त्यांना घरी परतण्याची परवानगी दिली आहे. मात्र याचदरम्यान सिलक्यारा बोगद्याबाबत केलेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालाची माहिती समोर आली आहे. 

सिलक्यारा बोगदा बांधण्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात येथे कठीण खडक असल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र बांधकाम सुरू झाल्यावर आतमध्ये मातीचे डोंगर असल्याचे आढळून आले. या बोगद्याचे बांधकाम २०१८ मध्ये सुरू झाले. यापूर्वी या जागेचे सर्वेक्षण करण्यात आले होते. बोगदा जेथे बांधला जाईल तेथे कठीण खडक असल्याचे सर्वेक्षणात स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. तसेच यातून बोगदा बांधणे सुरक्षित ठरेल, असा दावाही करण्यात आला होता. 

बांधकाम अभियंता प्रदीप नेगी आणि सुरक्षा व्यवस्थापक राहुल तिवारी यांनी सांगितले की, डीपीआरमध्ये समाविष्ट केलेल्या सर्वेक्षणाच्या अहवालात जे दावा करण्यात आला होता ते बांधकामात दिसत नाही. ते म्हणाले की, खडकांऐवजी सैल माती बोगदा बांधण्याच्या मार्गात येत आहे, हे सर्वात मोठे आव्हान आहे. मोकळ्या मातीमुळे पुन्हा पुन्हा डेब्रिज पडतो. मात्र असे असतानाही हा बोगदा सुरक्षितपणे बांधला जात असल्याचे राहुल तिवारी म्हणाले. 

अपघातामुळे बोगदा बांधण्याची प्रतीक्षा वाढली... 

सिल्क्यरा बोगद्याचे काम जुलै २०२२मध्ये पूर्ण होणार होते, मात्र त्याला विलंब होत होता. आता अपघातानंतर आणि बचावकार्याला बराच वेळ लागल्याने बोगदा बांधण्याची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. मात्र, त्याचे बांधकाम वेळेत पूर्ण होईल, असा विश्वास कंपनीच्या अधिकाऱ्यांना आहे.

कामगारांवर झाली पैशांची बरसात

बोगदा बांधणारी नवयुग ही कंपनी आता बोगद्यातून सुरक्षितपणे बाहेर काढलेल्या कामगारांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई देणार आहे. याचवेळी सर्व मजुरांना दोन महिन्यांच्या पगारासह रजाही देण्यात येणार आहे. सर्वांत मोठी बाब म्हणजे या बचावकार्यात सहभागी झालेल्या कामगारांना दोन महिन्यांचा बोनसही दिला जाणार आहे. उत्तराखंड सरकार बोगद्यामध्ये अडकलेल्या प्रत्येक कामगाराला एक लाख रुपये, हॉस्पिटलचा खर्च आणि प्रवासभाडे देत आहे. 

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडIndiaभारत