Supreme Court: सुप्रीम कोर्टात सध्या प्रकरणांच्या सुनावणीसोबतच सरन्यायाधीशांच्या एका खास शैलीतील टिप्पणीची जोरदार चर्चा रंगली आहे. सुरेश देवी विरुद्ध अलाहाबाद उच्च न्यायालय या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, पुढील तारीख देताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी उत्तर प्रदेशातील होळीच्या परंपरेचा संदर्भ देत एक मिश्किल विधान केले, ज्यामुळे कोर्टरुममध्ये एकच हस्यकल्लोळ पाहायला मिळाला.
सुप्रीम कोर्टात या प्रकरणाची पुढची तारीख ठरवली जात होती. सुरुवातीला सरन्यायाधीशांनी हे प्रकरण होळीच्या सुट्टीनंतर लगेच लिस्ट करण्यास सांगितले. मात्र, क्षणभर थांबून त्यांनी आपला निर्णय बदलला आणि म्हणाले, "नाही, नाही... हे प्रकरण त्याच्याही पुढच्या आठवड्यात ठेवा. अलाहाबाद आहे भाऊ! भांगची नशा उतरण्यासाठी किमान एक आठवडा तर लागेलच!"
उत्तर प्रदेशात, विशेषतः प्रयागराज भागात होळीच्या वेळी पारंपरिकरीत्या भांग पिण्याची प्रथा आहे. याच संदर्भाने सरन्यायाधीशांनी अनौपचारिकपणे केलेले हे विधान ऐकताच कोर्टात उपस्थित वकील आणि कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. हे विधान सध्या कायदेशीर वर्तुळात आणि सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
दुसऱ्या बाजूला वकिलाला कडक शब्दांत फटकारले
एकीकडे मिश्किल टिप्पणी केली असतानाच, दुसऱ्या एका प्रकरणात सरन्यायाधीशांचा रौद्र अवतारही पाहायला मिळाला. पूरन चंद्र सेन विरुद्ध राजस्थान राज्य या प्रकरणाच्या सुनावणीत एका वकिलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.
वकिलाची ही याचिका पाहून सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले. त्यांनी वकिलाला कडक शब्दांत फटकारत विचारले, "तुम्हाला वकिलीचा परवाना देण्याची चूक कोणी केली? लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि तुम्ही अशा फालतू याचिका दाखल करत असाल, तर विश्वास कसा टिकणार?"
कुस्ती खेळायला आलात का?
याच सुनावणीदरम्यान सरन्यायाधीशांनी वकिलाच्या वेशभूषेवरूनही ताशेरे ओढले. वकिलाने योग्य गणवेश घातला नसल्याचे पाहून ते म्हणाले, "तुम्ही बँड घातलेला नाही, असं वाटतंय की कोणासोबत तरी कुस्ती खेळायलाच मैदानात उतरला आहात." न्यायालयाने स्पष्ट केले की, तुमची राजकीय विचारसरणी वेगळी असू शकते, पण त्या आधारावर तुम्ही कोणत्याही घटनात्मक पदावरील व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी करू शकत नाही. अखेर वकिलाने आपली चूक मान्य करत खेद व्यक्त केला.
Web Summary : Chief Justice's witty remark on Allahabad's Holi tradition caused laughter in Supreme Court. He later reprimanded a lawyer for a frivolous petition against PM Modi and criticized his attire.
Web Summary : इलाहाबाद की होली पर मुख्य न्यायाधीश की मजाकिया टिप्पणी से सुप्रीम कोर्ट में हंसी गूंजी। बाद में उन्होंने पीएम मोदी के खिलाफ एक तुच्छ याचिका के लिए एक वकील को फटकार लगाई और उसकी वेशभूषा की आलोचना की।