शहर पानासाठी पी
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:21+5:302015-09-01T21:38:21+5:30
शहर

शहर पानासाठी पी
श रनाशिक,बुधवार दि. २ सप्टेंबर २0१५पंचवटी वाचनालयातर्फे शिक्षक गौरवपंचवटी : पंचवटी वाचनालय पुरस्कृत नागरिक शिक्षक गौरव समितीच्या वतीने शिक्षक गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. ५ रोजी सायंकाळी ४ वाजता पंचवटी वाचनालयाच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल. प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांच्या हस्ते सत्कार होणार असून, अध्यक्षस्थानी के. के. मुखेडकर असतील.फोटो : फेलिसिटेश्नकॉँग्रेस कमिटीत आनंदोत्सवनाशिक : नवीन भूमी अधिग्रहण कायदा रद्द झाल्याबद्दल कॉँग्रेस कमिटीमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. शेतकर्यांच्या हितासाठी कॉँग्रेसने खंबीर भूमिका घेतल्याबद्दल पक्षाध्यक्षांचे अभिनंदन करण्यात आले. यानंतर फटाके फोडून आनंदोत्सव करण्यात आला. याप्रसंगी शरद अहेर, डॉ. शोभा बच्छाव, हेमलता पाटील, अश्विनी बोरस्ते, उद्धव निमसे, वत्सला खैरे आदि उपस्थित होते.फोटो : ०१पीएचएसपी०१रस्ता दुभाजकाचे सुशोभिकरणइंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील राजे छत्रपती चौक ते पाथर्डी गाव दरम्यानच्या रस्ता दुभाजकांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या दुभाजकांमध्ये खजुराच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. यावेळी देवानंद बिरारी, विनोद वझरे, मनोज टिबरेवाल, जी. एस. माळी, शरद निकम, शिरीष भालेराव आदिंसह नागरिक उपस्थित होते.फोटो: डेटस् प्लान्ट