शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
3
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
4
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
5
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
6
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांनी टीका
7
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
8
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
9
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
10
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
11
पालकमंत्री, आमदारांमध्ये संघर्ष; शिंदेसेना, राष्ट्रवादी देणार टक्कर 
12
चांदी ‘जीएसटी’सह अडीच लाख पार; १४,५०० वाढ
13
महामुंबईसाठी चित्रपट, नाट्यकलावंतांचा जाहीरनामा; महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय म्हणतात कलाकार?
14
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
15
मूर्ती लहान, किर्ती महान! U19 वर्ल्ड कपआधी BCCI नं वैभव सूर्यवंशीकडे दिली थेट कॅप्टन्सीची जबाबदारी
16
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
17
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
18
India U19 Squad For ICC Men’s U19 World Cup : तोच पॅटर्न! अंडर १९ वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा
19
तैवानमध्ये मोठा भूकंप, इमारती हादरल्या, लोकांमध्ये दहशत, आसामपर्यंत जाणवले धक्के
20
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
Daily Top 2Weekly Top 5

Breaking: नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर; शिवसेनेचा सभात्याग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 21:26 IST

राज्यसभेच्या परीक्षेत नागरिकत्व सुधारणा विधेयक पास

नवी दिल्ली: राज्यसभेत नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर झालं आहे. या विधेयकाच्या बाजूनं १२५ सदस्यांनी तर विरोधात १०५ खासदारांनी मतदान केलं. राज्यसभेतील मतदानावेळी शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला. नागरिकत्व सुधारणा विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवण्याबद्दलही राज्यसभेत मतदान झालं. मात्र या सूचनेच्या बाजूनं केवळ ९९ मतं पडली. तर १२४ मतं या सूचनेविरोधात गेली. मोदी सरकारनं मांडलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकात विरोधी पक्षांनी १४ सुधारणा सुचवल्या. मात्र भाजपा आणि मित्रपक्षांचं संख्याबळ जास्त असल्यानं यातील एकही सुधारणा मंजूर होऊ शकली नाही. सोमवारी रात्री या विधेयकाला लोकसभेनं मंजुरी दिली होती. लोकसभेतील ३११ खासदारांनी विधेयकाच्या बाजूनं मतदान केलं होतं. तर ८० खासदारांनी विधेयकाच्या विरोधात मतदान केलं होतं. लोकसभेत विधेयकाच्या बाजूनं मतदान करणाऱ्या शिवसेनेनं राज्यसभेत मात्र तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. सकाळपासून राज्यसभेतील चर्चेत सहभागी झालेल्या शिवसेनेच्या खासदारांनी मतदानावेळी सभात्याग केला. शिवसेनेनं लोकसभेत विधेयकाच्या बाजूनं मतदान केल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर शिवसेनेनं विधेयकाबद्दलची भूमिका बदलली. शिवसेनेसोबतच बहुजन समाज पक्षाच्या दोन खासदारांनीदेखील मतदानावर बहिष्कार टाकला. 

काय आहे 'या' नागरिकत्व सुधारणा विधेयकात ?1955ला कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आली होती. त्यावेळी भारताला खेटून असलेल्या म्हणजेच शेजारील असलेल्या राज्यांमधून आलेल्या निर्वासितांना भारतीय नागरिकत्व मिळण्याची तरतूद करण्यात आली. 31 डिसेंबर 2014च्या आधी ज्या निर्वासितांनी येऊन भारतात वास्तव्य केलेलं आहे, अशा मुस्लिमेतर नागरिकांना (बौद्ध, पारशी, ख्रिश्चन, शीख, जैन, हिंदू)  भारताचं नागरिकत्व बहाल केलं जातं. भारताचा नागरिक होण्यासाठी 11 वर्षं देशात राहणं आवश्यक असल्याचंही संविधानात नमूद केलेलं आहे. पण मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या बदलानंतर जे मुस्लिमेतर लोक 6 वर्षांहून अधिक काळ भारतात राहिलेले आहेत, अशांना भारताचं नागरिकत्व मिळणार आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकBJPभाजपाcongressकाँग्रेसParliamentसंसद