शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

नागालॅँडमध्ये नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचे भूत भाजपाच्या मानगुटीवर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 05:35 IST

घटक पक्षांना बुस्टर देऊन सत्ता काबीज करणाऱ्या भाजपासह समर्थकांना यंदाची निवडणूक अडचणीची ठरण्याची चिन्हे आहेत. गेल्या तीनवेळा लोकसभेची जागा जिंकणा-या एनपीएफने (नागा पीपल्स फ्रंट) नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरुद्ध आग ओकायला सुरुवात केल्याने एनडीपीपीसाठी (नॅशनॅलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी) हा मुद्दा डोकेदुखी ठरू पाहत आहे.

- कुंदन पाटीलकोहिमा : घटक पक्षांना बुस्टर देऊन सत्ता काबीज करणाऱ्या भाजपासह समर्थकांना यंदाची निवडणूक अडचणीची ठरण्याची चिन्हे आहेत. गेल्या तीनवेळा लोकसभेची जागा जिंकणा-या एनपीएफने (नागा पीपल्स फ्रंट) नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरुद्ध आग ओकायला सुरुवात केल्याने एनडीपीपीसाठी (नॅशनॅलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी) हा मुद्दा डोकेदुखी ठरू पाहत आहे. साहजिकच भाजपाविषयी तिथल्या घटक पक्षांमध्ये नाराजी पसरली आहे.भाजपा, काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेससह एनपीएफ (नागा पीपल्स फ्रंट), एनडीपीपी (नॅशनॅलिस्ट डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी), एनपीपी (नॅशनल पीपल्स पार्टी), जेडीयु (जनता दल युनायटेड), आप, तृणमूल काँग्रेस, लोक जनशक्ती पार्टी, युएनडीपी (युनायटेड नागा डेमोक्रेटिक पार्टी) आणि एनएनडीपी (नागा नॅशनल डेमोक्रेटिक पार्टी) यंदाच्या निवडणुकीत सक्रिय आखाड्यात राहणार आहेत.भाजपाप्रणित राष्टÑीय लोकशाही आघाडीशी (एनडीए) सध्या एनडीपीपीचे सूत जुळले आहे. विद्यमान खासदार थोकेओे येप्थॉमी (एनडीपीपी) यांना एनपीएफचे आव्हान असणार आहे. गेल्या दोन वर्षात नागालँडच्या जनतेने अनेक सत्तांतरांची मालिका अनुभवली.२०१४ मध्ये एनपीएफकडून नेइफिऊ रिओ हे खासदार म्हणून निवडून आले होते. आॅक्टोबर २०१७ मध्ये त्यांनी एनपीएफ सोडली आणि राज्यातल्या राजकारणात आले. तेव्हा त्यांनी एनडीपीपीमध्ये प्रवेश केला. तिकडे एनपीएफसोबत १५ वर्षांपासून असलेली आघाडी भाजपाने तोडली आणि एनडीपीपीशी घरोबा केला. फेब्रुवारी २०१८ मध्ये नागालँड विधानसभेची निवडणूक झाली. रियो बिनविरोध आमदार म्हणून निवडून आले.६० पैकी ५९ जागांसाठी मतदान झाले आणि निकालात रियोंच्या एनडीपीपीला एनडीएफने ओव्हरटेक केले. २७ जागा एनडीएफने जिंकल्या. त्याखालोखाल एनडीपीपी १८, भाजपा १२, एनपीपीने २ जागा राखल्या. काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.सत्तेचे पाय खोलवर रोवण्यासाठी भाजपाने एनडीपीपीला पाठिंबादिला आणि नेइफिऊ रिओ यांचा चेहरा मुख्यमंत्रीपदासाठी पुढेआणला. एनडीएफला सर्वाधिक जागा मिळाल्या असतानाही सत्तेपासून दूर राहावे लागत असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा एनडीएफचे तत्कालिन मुख्यमंत्री टी.आर.जेलियांग राजीनामा देत विरोधी बाकावर बसणे पसंत केले. तर काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही म्हणून तत्कालिन प्रदेशाध्यक्ष के.थेरी यांनी पदाचा राजीनामा दिला....आणि भाजपाचे दिवस फिरलेकेंद्रीय मंत्रिमंडळाने नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला मंजुरी दिली. ही बाब नागालँडच्या जनतेच्या जिव्हारी लागली. या विधेयकाविरुद्ध जनमत पेटले आहे. विधेयकाविरुद्ध भाजपाच्या आघाडीत असणाºया एनपीएफसह स्थानिक घटक पक्षांनी विधेयकठोकरले आहे. या विधेयकामुळे जनता एनडीपीपीवर डोळे वटारून आहे. साहजिकच भाजपाच्या या विधेयकाचा स्वीकार करणे एनडीपीपीला सोयीचे नाही. म्हणून खुद्द मुख्यमंत्री नेइफिऊ रिओ यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने विधेयक फेटाळून लावले. रिओंच्या या भूमिकेने भाजपाला ‘बुरे दिन’ सुरू झाल्याचे उघड झाले.

टॅग्स :BJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९