CAA Protests Live: नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, उत्तर प्रदेशात पाच जणांचा मृत्यू
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 19:31 IST2019-12-20T07:49:55+5:302019-12-20T19:31:41+5:30
नवी दिल्लीः दिल्ली पोलिसांसाठी शुक्रवारचा दिवस आव्हानात्मक आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतली परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. त्यातच ...

CAA Protests Live: नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलनाला हिंसक वळण, उत्तर प्रदेशात पाच जणांचा मृत्यू
नवी दिल्लीः दिल्ली पोलिसांसाठी शुक्रवारचा दिवस आव्हानात्मक आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतली परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. त्यातच नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी जामा मशीदबाहेर निदर्शने करण्यात येत आहे. मंडल आयोगाच्या विरोध प्रदर्शनानंतर दिल्लीतलं हे सर्वात मोठं आंदोलन असण्याची शक्यता आहे. दिल्लीतल्या विविध भागातून 40हून अधिक मोर्चे निघू शकतात. विशेष म्हणजे इंडियन मुझाहिद्दीन आणि सिमीशी संबंधित कट्टरवादीही या आंदोलनात सहभागी झाले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.
LIVE
10:13 PM
जोपर्यंत हा काळा कायदा मागे घेतला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, भीम आर्मीच्या चंद्रशेखर आझाद यांचा इशारा
Bhim Army Chief Chandrashekhar Azad at Delhi's Jama Masjid: Till the time,this black law is not withdrawn, the protest will continue. Since afternoon, the protest has been going on peacefully. People from the administration had entered Jama Masjid&lathi-charged people in the day. https://t.co/n8BcEb89cXpic.twitter.com/6rVrd2VcBJ
— ANI (@ANI) December 20, 2019
10:12 PM
दिल्ली दर्यागंज परिसरात शिघ्र कृती दलाच्या जवानांचा फ्लॅग मार्च
Delhi: Rapid Action Force (RAF) takes out flag march in Daryaganj area, after protest over #CitizenshipAct in the area today. pic.twitter.com/zi5uSV4Tl0
— ANI (@ANI) December 20, 2019
07:27 PM
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनावेळी झालेल्या हिंसाचारात ऊत्तर प्रदेशात पाच आंदोलकांचा मृत्यू
Uttar Pradesh government's Additional Chief Secretary, Awanish Kumar Awasthi: 5 people died today in the violence during protests against #CitizenshipAmendmentAct, across the state. (file pic) pic.twitter.com/ZryS0VaZ02
— ANI UP (@ANINewsUP) December 20, 2019
06:55 PM
दिल्लीतील कनॉट प्लेस परिसरात सेंट्रल पार्क येथे नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ नागरिकांचे आंदोलन
Delhi: People hold demonstration at Central Park in Connaught Place in support of #CitizenshipAmendmentActpic.twitter.com/DstH3t1Dh4
— ANI (@ANI) December 20, 2019
06:15 PM
नागरिकत्व कायद्याविरोधात दिल्लीतील इंडिया गेट येथे आंदोलन
Delhi: Protest being held at India Gate against #CitizenshipAmendmentAct2019pic.twitter.com/vKuA9LcuhQ
— ANI (@ANI) December 20, 2019
05:41 PM
नागरिकत्व कायद्याविरोधात राज्यात तीव्र निदर्शने
Maharashtra: People in Pune protest against #CitizenshipAct and National Register of Citizens (NRC) pic.twitter.com/6Jnb4olkp3
— ANI (@ANI) December 20, 2019
05:21 PM
CAB एवढंच चांगलं असेल तर हे विधेयक मंजूर करताना मोदींनी मतदान का नाही केले? ममतांचा सवाल
West Bengal CM Mamata Banerjee in Kolkata: Agar CAB itna accha hai toh Pradhan Mantri ji aapne vote kyun nahi dala? Aap do din Parliament mein the, lekin jab aapne vote nahi dala toh mujhe yeh andaza hai ki aap bhi isse support nahi karte. Aap ise reject kar dijiye. pic.twitter.com/aBVNQBBiS9
— ANI (@ANI) December 20, 2019
05:05 PM
बीडमधील बशीरगंज भागातील गर्दी निवळली
बीड : बशीरगंज भागातील गर्दी निवळली, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दर, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी उपस्थित
04:49 PM
मेरठमध्ये नागरिकत्व विधेयकाला विरोध करणाऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक
#WATCH Meerut: Protesters pelt stones at police personnel during demonstration against #CitizenshipAmendmentAct at Lisari Gate pic.twitter.com/w46uD2GCSQ
— ANI UP (@ANINewsUP) December 20, 2019
04:48 PM
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात जळगाव मुस्लिम मंचतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे
जळगाव - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात जळगाव मुस्लिम मंचतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
04:47 PM
अंबरनाथमध्ये हजारो मुस्लिम बांधवांचा नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला कडाडून विरोध
अंबरनाथ: मुस्लिम जमात यांच्यावतीने आज अंबरनाथ मध्ये निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात अंबरनाथ मधील हजारो मुस्लिम बांधव एकत्रित आले होते. शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर कोसगाव येथील दर्ग्या पासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. दुपारी अडीच वाजता हा मोर्चा तहसील कार्यालयाकडे निघाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोर्चाच्या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर तहसील कार्यालयाला चोख बंदोबस्त देण्यात आले होते. तहसील कार्यालयात मोर्चा आल्यावर मोठमोठ्याने घोषणाबाजी करण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी घोषणाबाजी करू नये अशी विनंती मोर्चेकरयांना केली. मात्र त्याला त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. कोणताही अनुचित प्रकार न घडता हा मोर्चा शांततेत पार पडला.
04:46 PM
बीडमध्ये दोन बसेसवर दगडफेक, अश्रूधुराच्या नलकांड्या फोडून जमाव पांगविण्याचा प्रयत्न
बीडमध्ये दोन बसेसवर दगडफेक, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न
10:35 AM
नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोधच, पण सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणार नाही- मायावती
नागरिकत्व सुधारणा कायद्याला मी नेहमीच विरोध केला आहे. त्याविरोधात आंदोलनही केलं आहे. परंतु आम्ही इतरांसारखे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि हिंसाचार करणार नाही- मायावती
Mayawati, BSP: We have always opposed the #CitizenshipAmendmentAct and we have been protesting against it since beginning but like other parties we don't believe in destruction of public property and violence. pic.twitter.com/HMwGbojrPQ
— ANI UP (@ANINewsUP) December 20, 2019
10:15 AM
समाजवादी पक्षाचे खासदार शफिकुर रहमान बारकसह 17 जणांविरोधात FIR दाखल
Sambhal: An FIR has been registered against 17 people including Samajwadi Party leaders, MP Shafiqur Rahman Barq and Feroz Khan in connection with violence on December 19. #CitizenshipAmendmentActpic.twitter.com/GtaQ5jUpTP
— ANI UP (@ANINewsUP) December 20, 2019
08:34 AM
कर्नाटकातील मंगळुरूमधल्या हिंसाचारामुळे आज शाळा-कॉलेज बंद
08:32 AM
लखनऊमधल्या हिंसक प्रदर्शनामुळे मोबाइल इंटरनेट आणि एसएमएस सेवा 21 डिसेंबरपर्यंत खंडित
07:58 AM
कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि बिहारमधल्या काही भागांत झालेल्या हिंसाचारात तीन जणांचा मृत्यू
07:52 AM
जामिया आणि जसोला विहार मेट्रो स्टेशन आजही राहणार बंद: DMRC