शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
5
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
6
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
7
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
8
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
9
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
10
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
11
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
12
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
13
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
14
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
15
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
16
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
17
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
18
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
19
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
20
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या

CAA Protest: 'हाँगकाँग पॅटर्न' जोरात; इंटरनेट बंदीवर आंदोलकांनी शोधला पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 10:58 AM

सरकार, प्रशासनाच्या इंटरनेट बंदीवर आंदोलकांचा तोडगा

चेन्नई: सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात सध्या देशातलं वातावरण तापलं आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं सुरू असून काही ठिकाणी आंदोलनांना हिंसक वळणदेखील लागलं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र आंदोलकांनी यावरही तोडगा शोधून काढला आहे. आंदोलकांनी इंटरनेटशिवाय चालणाऱ्या ब्रिजफाय, फायर चॅटसारख्या मेसेजिंग अ‍ॅप्सचा वापर सुरू केला आहे. चीनविरोधात रस्त्यावर उतरलेल्या हाँगकाँगमधील आंदोलकांनीदेखील याच मार्गाचा वापर केला होता. हाँगकाँमध्ये आंदोलनादरम्यान ब्रिजफाय, फायर चॅटचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला होता. ब्रिजफाय, फायर चॅटच्या मदतीनं ब्लू टूथच्या माध्यमातून काही अंतरावरील व्यक्तींना मेसेज करता येतात. आसाम आणि मेघालयात १२ डिसेंबरपासून इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या. तेव्हापासून ब्रिजफाय डाऊनलोड करण्याचं प्रमाण ८० टक्क्यांनी वाढल्याची आकडेवारी अमेरिकन अ‍ॅप इंटेलिजन्स फर्म ऐपोटॉपियानं दिली आहे. आसाम आणि मेघालयानंतर देशाच्या इतर राज्यांमध्येही सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनं सुरू झाली. त्यामुळे आसाम आणि मेघालयापाठोपाठ इतर अनेक राज्यांमध्येही इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली. त्यामुळे या राज्यांतही ब्रिजफाय, फायर चॅटसारख्या मेसेजिंग अ‍ॅप्सचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. इंटरनेट सेवा खंडित होण्याच्या आधी देशात दिवसाकाठी सरासरी २५ जण ब्रिजफाय अ‍ॅप डाऊनलोड करायचे. १३ डिसेंबरनंतर यात १०० टक्क्यांनी वाढ झाली. सध्या दर दिवशी जवळपास २६०९ जण ब्रिजफाय अ‍ॅप डाऊनलोड करत आहेत. ब्रिजफाय अ‍ॅपच्या अ‍ॅक्टिव्ह यूजर्सची संख्यादेखील ६५ पटीनं वाढली आहे. ११ डिसेंबरच्या आधी ब्रिजफाय अ‍ॅप १८४ जण वापरायचे. १२ डिसेंबरपासून हा आकडा वाढून १२,११८ वर पोहोचला आहे. एकट्या दिल्लीत या अ‍ॅपच्या डाऊनलोड आणि वापराचं प्रमाण ३० पटीनं वाढलं आहे.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक