अहमदाबाद विमानतळावरुन एक मोठी बातमी समोर आली आहे. अचानक विमानतळावर एका 65 वर्षीय व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला, यावेळी वेळीच घटनास्थळी दाखल होत एका सीआयएसएफ अधिकाऱ्याने त्या व्यक्तीचा जीव वाचवला आहे.
नारायण चौधरी (६५) हे मंगळवार २० डिसेंबर रोजी अहमदाबादहून हैदराबादला निघाले होते. विमानतळावर त्यांची सुरक्षा तपासणी केली, यानंतर ते फ्लाइटची वाट पाहू लागले. यानंतर अचानक त्यांना अस्वस्थता जाणवली आणि ते बेशुद्ध पडले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही होती. यावेळी घटनास्थाळी उपस्थित असलेल्या एका CISF अधिकाऱ्याने वेळीच उपचार करुन जीव वाचवला.
INS Arnala: शत्रुच्या नजरेत न येणारी 'सायलेंट शिप'; नौसेनेत सामील झाली INS अर्नाला, पाहा Photos...
सीआयएसएफने या घटनेचा व्हिडिओही शेअर केला आहे. सोशल मीडियावर नेटकरी CISF अधिकाऱ्याचे कौतुक करत आहेत.
CPR म्हणजे काय?
CPR म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन. ही एक आपत्कालीन प्रक्रिया आहे जी एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास किंवा हृदय थांबल्यास त्याचे प्राण वाचविण्यात मदत करू शकते. हृदयविकाराचा झटका किंवा रस्ता अपघात किंवा विजेचा धक्का यांसारख्या मोठ्या आघात यांसारख्या परिस्थितीत CPR दिला जातो.