शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

सीआयएसएफची कमाई २०० कोटी रुपये; खासगी कंपन्यांनाही पुरविली जाते सेवा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2018 3:16 AM

सरकारी संस्थांची सुरक्षा करण्यासाठी १९६९ मध्ये स्थापन करण्यात आलेले केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आता खासगी क्षेत्रातील कंपन्याच्या सुरक्षेसाठीचे एक प्रमुख सुरक्षा दल बनले आहे. या माध्यमातून सीआयएसएफचे उत्पन्न २०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : सरकारी संस्थांची सुरक्षा करण्यासाठी १९६९ मध्ये स्थापन करण्यात आलेले केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आता खासगी क्षेत्रातील कंपन्याच्या सुरक्षेसाठीचे एक प्रमुख सुरक्षा दल बनले आहे. या माध्यमातून सीआयएसएफचे उत्पन्न २०० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.सीआयएसएफने २०१४-१५ मध्ये २७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविले. ते २०१६-१७ मध्ये ५८ कोटींवर पोहोचले. तर, २०१७-१८ च्या पहिल्या दहा महिन्यात हे उत्पन्न ६२ कोटींवर पोहोचले होते. या आर्थिक वर्षात ही कमाई ८० कोटी रुपयांवर पोहोचली आहे, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.मुंबईतील अतिरेकी हल्ल्यानंतर २००९ मध्ये यूपीए सरकारने सीआयएसएफ अधिनियमात दुरुस्ती केली. त्यानंतर सार्वजनिक उपक्रम आणि खासगी संस्थांच्या संरक्षणासाठी १.४० लाखांचे मजबूत दल ३२८ संस्थांची सुरक्षा करत आहे. जामनगर येथील रिलायन्स रिफायनरी, बंगळुरु, म्हैसूर आणि पुणे येथील इन्फोसिस कॅम्पस, कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेड प्रोजेक्ट, ओडिशातील कलिंगानाग येथील टाटा स्टिल प्रोजेक्ट यांना ही सुरक्षा देण्यात आलेली आहे. हरिद्वार येथील रामदेवबाबा यांच्या पतंजली फूड अँड हर्बल पार्क प्रा. लिमिटेडला सीआययएसएफच्या ३५ जवानांची सुरक्षा देण्यात आली आहे.भारतात अनेक खासगी सुरक्षा एजन्सी असल्या तरी कायद्यानुसार त्यांच्या गार्डला स्वयंचलित हत्यारे वापरण्यास परवानगी नाही. सीआयएसएफ जवानांकडे स्वयंचलित हत्यारांसह वायरलेस उपकरणे आहेत. ती स्फोटकांची ओळख करण्यास मदत करतात. तथापि, खासगी सुरक्षा कंपन्यांचा संघ असलेली सेंट्रल असोसिएशन आॅफ प्रा. सेक्युरिटी इंडस्ट्री (सीएपीएसआय) ही संस्था देशभरात ५५ लाख कामगारांना रोजगार देते. खासगी सुरक्षा एजन्सींना स्वयंचलित हत्यारे वापरण्याची परवानगी देण्यात यावी, अशी याचिका त्यांनी केली आहे.७६ कंपन्या प्रतीक्षेत- गतवर्षी नवी मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेट आय टी पार्कने सीआयएसएफची सुरक्षा मागितली होती. त्यासाठी कंपनीने वार्षिक १० कोटी रुपयांचे शुल्क दिले आहे. तर, हरिद्वारमधील कंपनीच्या सुरक्षेसाठी रामदेवबाबा यांनी ३.२५ कोटी रुपये शुल्क दिले आहे.- सीआयएसएफच्या सुरक्षेसाठी आणखी ७६ खासगी कंपन्यांनी सुरक्षा मागितली आहे. या कंपन्यात इंडियन हॉटेल कंपनी लिमिटेडचे ताज महल पॅलेस आदींचा समावेश आहे.

टॅग्स :Forceफोर्स