शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Cipla ची कोरोना टेस्ट कीट Viragen लाँच; 'या' तारखेपासून सुरू होणार पुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 12:56 IST

Cipla Coronavirus Kit : दिग्गज कंपनी सिप्लानं आपलं कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी आवश्यक असलेलं टेस्टिंग कीट लाँच केलं आहे. 

ठळक मुद्दे दिग्गज कंपनी सिप्लानं आपलं कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी आवश्यक असलेलं टेस्टिंग कीट लाँच केलं आहे. ICMR कडून होम टेस्टिंग कीटला मंजुरी

दिग्गज कंपनी सिप्लानं (Cipla) आपली कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी आवश्यक असलेलं टेस्टिंग कीट लाँच केलं आहे. कोरोना विषाणूच्या टेस्टिंगबाबतचा कंपनीचा हा तिसरा प्रोडक्ट आहे. सिप्लानं गुरूवारी आपल्या RT-PCR टेस्ट कीट Viragen च्या कमर्शिअलायझेशनची घोषणा केली. कंपनीनं यासाठी Ubio Biotechnology Systems सोबत करार केला आहे. या टेस्टिग कीटचा पुरवठा २५ मेपासून सुरू होणार आहे. "या लाँचमुळे देशात टेस्टिंग सर्व्हिसेस आणि त्याच्या कॅपॅसिटीशी निगडीत असलेल्या आव्हानांचा सामना करण्यास मदत मिळेल. याशिवाय डायग्नोस्टिक स्पेसमध्ये कंपनीचा विस्तारही होईल," असं सिप्लानं रेग्युलेटरी फायलिंगमध्ये म्हटलं आहे. Viragen टेस्ट कीट Ubio Biotechnology Systems च्या भागीदारीसह लाँच केलं जाईल. तसंच याचा पुरवठा २५ मे पासून करण्यात येईल असं सिप्लानं नियामकीय फायलिंगमध्ये सांगितलं. "महासाथीच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आलेल्या या संकटात ही भागीदारी अधिक लोकांपासून याची पोहोच निश्चित करेल आणि कोरोनाच्या विरोधातील लढाईत अॅक्सेसिबिलिटी निश्चित करेल," असं मत सिप्लाचे जागतिक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक उमंग वोहरा यांनी व्यक्त केलं. 

DRDO चं अँटी कोविड औषध 2-DG कधी येणार बाजारात, किती असेल किंमत?; डॉ. रेड्डीजनं दिली माहितीICMR कडून होम टेस्टिंग कीटला मंजुरीकोरोना चाचणी करण्यासाठी लागणाऱ्या भल्यामोठ्या रांगा आणि त्याचे रिपोर्ट येण्यास लागणारा वेळ हे त्रास आता वाचणार आहेत. तसेच रांगेत, गर्दीत गेल्याने कोरोना नसला तरी होण्याच्या भीतीने कोरोना चाचणी करण्यास टाळाटाळ करण्याचे प्रकार कमी होणार आहेत. (India approved on Wednesday the first home test for Covid-19) कारण आता घरच्या घरी स्वत:च कोरोनाची चाचणी करता येणार आहे. ICMR कडून गाईडलाईन जारी करण्यात आल्या आहेत. घरच्या घरी रॅपिड अंटिजेन किट्स (Rapid Antigen Kits) द्वारे कोरोना चाचणी करण्यास इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (Indian Council of Medical Research) परवानगी दिली आहे. (ICMR issued detailed guidelines on who can use it and how.) केवळ कोरोनाची लक्षणे दिसणाऱ्या व्यक्ती आणि कोरोना बाधिताच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्ती त्यांच्या घरीच रॅपिड अँटिजेन किट घेऊन कोरोना चाचणी करू शकणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत