सिडको-सातपूरला उद्या-परवा पाणी नाही
By Admin | Updated: March 24, 2015 23:47 IST2015-03-24T23:06:53+5:302015-03-24T23:47:32+5:30
नाशिक : शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्राला गंगापूर धरण पंपिंग स्टेशन येथे कच्च्या पाण्याची पुरवठा करणारी पाइपलाइन बसविण्यात येणार असल्याने येत्या गुरुवारी (दि.२६) सातपूर व सिडको भागातील सर्व प्रभागांमध्ये सकाळी १० वाजेपासून ते दुसर्या दिवशी शुक्रवारी (दि.२७) सकाळी १० वाजेपर्यंतचा पाणीपुरवठा होणार नाही. शुक्रवारी सकाळी १० वाजेनंतर पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक १५ व २२ आणि नाशिकरोड विभागातील प्रभाग क्रमांक ६१ मधील पिंपळगाव खांब व वडनेर गेट परिसराचाही त्यात समावेश असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने एका प्रसिद्धिपत्रकान्वये कळविले आहे.