शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

चौकीदाराच्या पक्षानं स्वत:च्या साईटसाठी आमचा कोड चोरला; आंध्रातील स्टार्ट-अपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 8:54 AM

टेम्प्लेट वापरताना भाजपानं साधं क्रेडिटदेखील दिलं नाही

हैदराबाद: भारतीय जनता पार्टीनं त्यांच्या अधिकृत वेबसाईटसाठी टेम्प्लेट चोरल्याचा आरोप आंध्र प्रदेशातील एका वेब डिझाईन कंपनीनं केला आहे. भाजपानं कोणतंही क्रेडिट न देता टेम्प्लेटची बॅकलिंक काढून टाकल्याचा आरोप डब्ल्यूथ्रीलेआऊट्सनं (W3Layouts) केला. भाजपानं टेम्प्लेटसाठी कोणतंही क्रेडिट दिलं नाही. उलट त्याची बॅकलिंक मुद्दामहून काढून टाकली, असा दावा कंपनीनं केला. आपण तयार केलेलं टेम्प्लेट भाजपाकडून वापरलं जात असल्याचं पाहिल्यावर कंपनीनं ही बाब पक्षाच्या लक्षात आणून दिली. याबद्दल कंपनीनं त्यांच्या वेबसाईचवर एक ब्लॉगदेखील प्रसिद्ध केला. 'भाजपा आयटी सेलनं आमचं टेम्प्लेट वापरल्यानं आम्हाला सुरुवातीला फार आनंद झाला. मात्र आमची बॅकलिंक काढून, आम्हाला कोणतंही शुल्क न देता त्यांनी टेम्प्लेटचा वापर केल्याचं नंतर आमच्या लक्षात आलं. त्यांनी आम्हाला कोणतंही क्रेडिट दिलं नव्हतं,' असं कंपनीनं ब्लॉगमध्ये म्हटलं आहे. झालेला प्रकार आम्ही ट्विटरच्या माध्यमातून भाजपाच्या लक्षात आणून दिला, असं कंपनीनं सांगितलं. त्यानंतर भाजपानं ज्या ठिकाणी डब्ल्यूथ्रीलेआऊट्सचा उल्लेख होता, तो कोडच डिलीट करण्यात आला, असा आरोप कंपनीनं केला. 'आता त्यांनी कोड पूर्णपणे बदलला आहे. ज्या पक्षाचा नेता स्वत:ला देशाचा चौकीदार म्हणतो, त्या पक्षाकडून करण्यात आलेली ही कृती आमच्यासाठी धक्कादायक आहे. भाजपाकडून चोरी केली जात आहे आणि ती उघड झाल्यानंतरही त्यांना काहीच वाटत नाही,' अशा शब्दांमध्ये कंपनीकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कंपनीच्या या ब्लॉगनंतर सोशल मीडियानं भाजपावर जोरदार टीका केली आहे.  

टॅग्स :BJPभाजपा