शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

आगामी निवडणुकांसाठी RSS ची तयारी सुरू; आता मुस्लीम बहुल भागांतही सुरु करणार शाखा!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 3:11 PM

RSS: आगामी काळात विविध राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

चित्रकूट: मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर असलेल्या चित्रकूट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS च्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठक सुरू होती. सरसंघचालक मोहन भागवत यांनी या शिबिरात राजकीय विचारमंथनही केले. पश्चिम बंगालमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी तसेच आगामी काळात विविध राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून, आता मुस्लीम बहुल भागांत शाखा सुरू करण्यावर भर दिला जाणार असल्याचे समजते. (chitrakoot meeting rss to start shakas in muslim majority areas in country)

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या संघटनेत काही बदल केले असून, खांदेपालट करण्याचा निर्णय चित्रकूट येथील बैठकीत घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. क्षेत्र प्रचारक प्रदीप जोशी यांना अखिल भारतीय सह संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे आता भैय्याजी जोशी यांना संघ आणि विश्व हिंदू परिषदेदरम्यानचे संयोजक असतील. तर, डॉक्टर कृष्ण गोपाल यांना विद्या भारतीचे प्रमुख संपर्क अधिकारी बनवण्यात आले आहे. तसेच अरुण कुमार यांना संघ आणि भाजपमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

“भारत सरकारला जे संशोधन जमलं नाही, ते पतंजलीने करून दाखवलं”: बाबा रामदेव

बंद पडलेल्या शाखा, कार्यक्रम पुन्हा सुरू करणार

कोरोना कालावधीत बंद पडलेले कार्यक्रम आणि शाखा पुन्हा सुरू करण्यावर भर देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून, विशेष म्हणजे आता देशभरातील मुस्लीम वस्त्यांमध्ये आपल्या शाखा सुरू करण्याचा निर्णय संघाने घेतल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय केवळ मोठ्या आणि लहान शहरांमध्ये असलेला संघाचा प्रभाव आता गावागावांमध्ये पोहोचवण्यासाठी योजना, रणनीती तयार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. 

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणार RSS

पश्चिम बंगालमध्ये संघटन मजबूत करणार

पश्चिम बंगालमध्ये संघटना मजबूत करण्यासाठी संघाने मोठा निर्णय घेतला असून, राज्याची तीन खंडांमध्ये विभागणी करुन काम करण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमधील मुख्य कार्यालय कोलकातामध्ये, मध्य बंगालमधील कारभार वर्धमानमधून, तर राज्यातील उत्तरेकडील भागामधील संघाचे काम सिलीगुडीमधून हाताळले जाईल. पुढील वर्षी होणाऱ्या वेगवेगळ्या राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघाने ही रचना केल्याचे बोलले जात आहे.  

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघMohan Bhagwatमोहन भागवतElectionनिवडणूक