चिटफंड घोटाळा; मॉडेल अटकेत

By Admin | Updated: October 11, 2014 00:24 IST2014-10-11T00:24:10+5:302014-10-11T00:24:10+5:30

कोट्यवधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यात गुंतवणूकदारांची फसवणूक करणा-या अर्थतत्त्व ग्रुपसोबत संबंध असल्याच्या आरोपात मुंबईच्या प्रीती भाटिया या मॉडेलला अटक करण्यात आली.

Chitfund scam; Attend the model | चिटफंड घोटाळा; मॉडेल अटकेत

चिटफंड घोटाळा; मॉडेल अटकेत

भुवनेश्वर : कोट्यवधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यात गुंतवणूकदारांची फसवणूक करणा-या अर्थतत्त्व ग्रुपसोबत संबंध असल्याच्या आरोपात मुंबईच्या प्रीती भाटिया या मॉडेलला अटक करण्यात आली.
भाटिया सीबीआयसमोर गुरुवारी हजर झाली व तिची चौथ्यांदा चौकशी करण्यात आली. तीन तास चाललेल्या या चौकशीनंतर, आपला कुठल्याही घोटाळ्याशी काहीही संबंध नाही असे भाटियाने प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. याआधी सीबीआयने भाटिया हिच्या घरावर धाड घातली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: Chitfund scam; Attend the model