चीनच्या सैनिकांची घुसखोरी सुरूच !
By Admin | Updated: September 20, 2014 02:30 IST2014-09-20T02:30:26+5:302014-09-20T02:30:26+5:30
लडाखच्या चुमार भागातून चिनी सैनिक परतल्यानंतर शुक्रवारी पुन्हा चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान या भागातील एका टेकडीवर चढल्याने तणाव निर्माण झाला आहे.

चीनच्या सैनिकांची घुसखोरी सुरूच !
लेह/ नवी दिल्ली : लडाखच्या चुमार भागातून चिनी सैनिक परतल्यानंतर शुक्रवारी पुन्हा चिनी पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान या भागातील एका टेकडीवर चढल्याने तणाव निर्माण झाला आहे.
ईशान्य लडाखमधील चुमार भागातील एका टेकडीवर चढलेल्या चिनी सैनिकांनी हा भाग चीनचा असल्याचा दावा केला. भारतीय हद्दीत सुमारे 3क्क् जवान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या(एलएसी)जवळ वाहनांसह उभे ठाकल्याचे दिसून आले. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या चर्चेत घुसखोरीचा मुद्दा केंद्रस्थानी होता. दोन्ही देशांनी संयुक्त निवेदनात शांतता आणि सलोख्याचे वचन दिले असतानाच चीनने पुन्हा कुरापती सुरू केल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. गुरुवारी रात्री चिनी सैनिक त्यांच्या हद्दीत परतल्यानंतर शांतता निर्माण होण्याची चिन्हे दिसत होती. चिनी जवानांनी शुक्रवारी भारतीय हद्दीत तंबू रोवल्याने नव्याने वाद निर्माण झाला. लडाख हा जम्मू-काश्मीरचा भाग असल्यामुळे भारतीय लष्कर पूर्णपणो माघारी गेलेले नाही. त्यातच चिनी सैनिकांनी जाहीरपणो घुसखोरीचे आव्हान दिले आहे. चीनच्या सैनिकांनी गुरुवारी रात्री 9.45 वाजता सीमा बैठक न घेता माघार घेतल्यानंतर लष्कराने या भागातील जवानांची संख्या कमी केली होती. (वृत्तसंस्था)