बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 08:00 IST2025-07-14T08:00:15+5:302025-07-14T08:00:33+5:30

India Vs China: भारताच्या सागरी सीमेबाहेर होते परंतु विशेष आर्थिक क्षेत्राच्या (ईईझेड)च्या अगदी जवळ होते.

Chinese ships lurking in the Bay of Bengal; turning on and off their identification systems... | बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...

बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...

बंगालच्या उपसागरात वारंवार दिसणारी चिनी संशोधन जहाजे आता केवळ ‘वैज्ञानिक प्रयोग’ नसून धोरणात्मक देखरेखीचा प्रयत्न मानली जात आहेत. अलीकडेच, फ्रेंच गुप्तचर संस्था अनसीनलॅब्सने एका चिनी जहाजाचा मागोवा घेतला, जे १६ दिवसांपासून या भागात सक्रिय होते आणि या काळात ते अनेक वेळा एआयएस (ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टम) बंद करत असल्याचे आढळून आले, जे अनेकदा हेरगिरीच्या प्रकाराचे लक्षण असते. जाणून घ्या काय आहे प्रकरण...

जहाज काय करत होते?
फ्रेंच एजन्सीच्या मते, चिनी जहाज समुद्रतळाचे मॅपिंग, ध्वनी सर्वेक्षण आणि पाणबुडी मार्गांची ओळख आणि पाळत ठेवण्याचे काम करत होते. ते भारताच्या सागरी सीमेबाहेर होते परंतु विशेष आर्थिक क्षेत्राच्या (ईईझेड)च्या अगदी जवळ होते.

एआयएस बंद, मग कळले कसे?
जरी जहाजाने आपली ओळख लपवण्यासाठी एआयएस बंद केले असले तरी, त्याचे रेडिओ फ्रिक्वेन्सी (आरएफ) सिग्नल सक्रिय राहिले, ज्यामुळे ते ट्रॅक केले जाऊ शकले. चीन अशा मोहिमांचे वर्णन वैज्ञानिक संशोधन म्हणून करतो, परंतु विश्लेषकांच्या मते, त्यांचा उद्देश डावपेचाबद्दल माहिती गोळा करणे असू शकते.

डावपेचांचा उद्देश काय आहे?
चीनची ही कृती हिंदी महासागरात आपली पकड मजबूत करण्याच्या त्याच्या धोरणाचा एक भाग आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. हंबनटोटा (श्रीलंका) आणि ग्वादर (पाकिस्तान) सारख्या बंदरांवर ते आधीच उपस्थित आहे. त्यामुळे त्यांची ही कृती 'स्ट्रिंग ऑफ पर्ल्स' धोरणाचे म्हणजेच भारताला सर्व बाजूंनी घेरण्याची त्याची रणनीती दर्शवते.

भारत पूर्णपणे सतर्क आहे का?, काय केली तयारी?
भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाने या घटनेनंतर लगेचच दक्षता वाढवली असून, सुरक्षा प्रोटोकॉलचा आढावा घेण्यात आला आहे. गेल्या वर्षीही भारताच्या क्षेपणास्त्र चाचण्या आणि नौदल सरावांमध्ये चिनी संशोधन जहाजे दिसली होती. अशा परिस्थितीत, भारत आता बंगालच्या उपसागरातील संवेदनशील भागात आपली सागरी देखरेख व्यवस्था अधिक मजबूत करत आहे.

Web Title: Chinese ships lurking in the Bay of Bengal; turning on and off their identification systems...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.