नवी दिल्ली येथे पोलिसांनी चिनी हेराला केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 05:32 IST2018-09-22T05:23:03+5:302018-09-22T05:32:32+5:30
चीनच्या एका हेराला दिल्ली पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून भारतीय पासपोर्ट व आधार कार्ड हस्तगत करण्यात आले आहे.

नवी दिल्ली येथे पोलिसांनी चिनी हेराला केली अटक
नवी दिल्ली : चीनच्या एका हेराला दिल्ली पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून भारतीय पासपोर्ट व आधार कार्ड हस्तगत करण्यात आले आहे. त्याला मणिपूरमधून पासपोर्ट जारी करण्यात आल्याचे तपासात आढळले. चार्ली पेंग या ३९ वर्षांच्या चिनी नागरिकाला भारतीय कागदपत्रे मिळवून देण्यात कोणी मदत केली होती, त्याचा चीनचा सैन्याशी संबंध आहे का, भारतात तो कोणकोणत्या ठिकाणी कोणाला भेटत असे, याचा तपास सुरू आहे.