भारतातील मोफत वीज योजनेला चीनचे इन्व्हर्टर्स! सौरऊर्जा क्षेत्रातही केली घुसखोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 07:51 AM2024-04-04T07:51:18+5:302024-04-04T07:51:56+5:30

Chinees Inverters : पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर घराच्या छतावर सोलार रूफ टॉप बसवून वीज उत्पादित करण्याचे प्रमाण वाढले आहे. एकाच महिन्यात सोलार यंत्रणा बसविणाऱ्यांची संख्या एक कोटीहून अधिक झाली आहे.

Chinees inverters to India's free electricity scheme! Intrusion made in solar energy sector as well | भारतातील मोफत वीज योजनेला चीनचे इन्व्हर्टर्स! सौरऊर्जा क्षेत्रातही केली घुसखोरी

भारतातील मोफत वीज योजनेला चीनचे इन्व्हर्टर्स! सौरऊर्जा क्षेत्रातही केली घुसखोरी

- कमल शर्मा
नागपूर - पंतप्रधान सूर्यघर वीज योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर घराच्या छतावर सोलार रूफ टॉप बसवून वीज उत्पादित करण्याचे प्रमाण वाढले आहे. एकाच महिन्यात सोलार यंत्रणा बसविणाऱ्यांची संख्या एक कोटीहून अधिक झाली आहे. यातून पर्यावरण रक्षणाचा हेतू साध्य झाला परंतु यात चीननेही घुसखोरी केली आहे.

सोलार यंत्रणेसाठी इन्व्हर्टर लागतात. सध्या देशामध्ये कार्यरत असलेले ७० टक्के इन्व्हर्टर चिनी बनावटीचे आहेत. इन्व्हर्टर कंपन्यांचे स्वत:चे ॲप आहेत. चीनच्या शेनझेन येथील शेनझेन ऐंबाड कंपनीनेही असेच अॅप विकसित केले. या ॲपद्वारे सोलर रूफ टॉपच्या उत्पादनासहित अन्य माहितीही मिळते. मात्र, हे ॲप सुरू करताच लोकेशन चीनची राजधानी बीजिंग असल्याचे दाखविले जाते. लोकांच्या घरांवर लावण्यात येणाऱ्या सोलर रूफ टॉपची सारी सूत्रे चीनच्या हातात आहेत. भारत व चीनमध्ये विविध मुद्द्यांवरून तणाव आहे. दोन दिवसांपूर्वीच चीनने अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावे बदलून भारताला आव्हान दिले आहे.

सोलार मॉड्युलच्या आयातीवर बंदी
केंद्र सरकारने १ एप्रिलपासून सोलर मॉड्युल्स आयातीवर बंदी घातली आहे. मेड इन इंडिया उत्पादनांना प्राधान्य देणे हा या निर्णयामागील उद्देश आहे. याआधी मॉड्यूल्सच्या आयातीवर २०२१ साली केंद्र सरकारने बंदी घातली होती. या निर्णयामुळे चिनी बनावटीची सोलर उपकरणे भारतात विकायला येणार नाहीत.

एमएनआरईकडून दखल
नवीनीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने सौर ऊर्जा या विषयाशी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात सोलर यंत्रणेसंदर्भातील चिनी कंपन्यांच्या ॲपच्या मुद्द्यावर चर्चा झाली. भारतामध्ये बनलेले इन्व्हर्टर वापरण्यास अग्रक्रम देण्याची मागणी यात करण्यात आली. मंत्रालय या विषयावर सखोल विचार करून निर्णय घेणार आहे.

केवळ उत्पादनांची माहिती
एमएनआरई तसेच आमची ॲप्स पूर्णपणे भारतीय बनावटीची आहेत. सोलर रूफ टॉपच्या इन्व्हर्टरशी संबंधित ॲप चिनी बनावटीचे आहेत. मात्र, त्यामुळे कोणाचीही माहिती इतरांपर्यंत जात नाही. या ॲपमधून केवळ उत्पादनाचीच माहिती मिळते. एक महिन्यानंतर हेही बंद होईल, असे महावितरणच्या सूत्रांनी सांगितले.

Web Title: Chinees inverters to India's free electricity scheme! Intrusion made in solar energy sector as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.