शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

अशाप्रकारे उघडकीस आली चीनची अरुणाचल प्रदेशमधील घुसखोरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 00:00 IST

डिसेंबर महिन्यामध्ये चिनी सैन्याच्या एका पथकाने अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करून रस्ता बांधल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर भारतीय जवानांनी विरोध गेल्यानंतर चीनी सैन्य माघारी परतले होते. दरम्यान, या प्रकरणाबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.

गुवाहाटी - डिसेंबर महिन्यामध्ये चिनी सैन्याच्या एका पथकाने अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करून रस्ता बांधल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर भारतीय जवानांनी विरोध गेल्यानंतर चीनी सैन्य माघारी परतले होते. दरम्यान, या प्रकरणाबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. अरुणाचल प्रदेशातील अप्पर सीयांग जिल्ह्यातील ट्युटिंग भागामधील बिशिंग गावात चीनी सैन्याने केलेली घुसखोरी एका स्थानिक तरुणाच्या जागरुकतेमुळे वेळी उघडकीस आली होती.इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांच्या चौक्यांवर सामान पोहोचवण्याचे काम करणाऱ्या जॉन नामक स्थानिक तरुणाने चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत केलेली घुसखोरी पहिल्यांदा पाहिली. रोजच्या कामात गुंतलेला असताना त्याला चिनी सैन्याच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर त्याने या प्रकाराची माहिती लष्कराला दिली. त्यामुळे तातडीने कारवाई करून चिनी सैन्याला हुसकावून लावणे शक्य झाले.  इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांच्या चौक्यांवर सामान पोहोचवण्याचे काम करणाऱ्या जॉन नामक स्थानिक तरुणाने चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत केलेली घुसखोरी पहिल्यांदा पाहिली. रोजच्या कामात गुंतलेला असताना त्याला चिनी सैन्याच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर त्याने या प्रकाराची माहिती भारतीय लष्कराला दिली. त्यामुळे तातडीने कारवाई करून चिनी सैन्याला हुसकावून लावणे शक्य झाले. 

चीनने रस्ता बांधण्यासाठी यंत्रसामुग्री पाठवलेले ठिकाण दुर्गम भागात आहे. तसेच सुमारे चार हजार फूट उंचावर वसलेले आहे. बिशिंगमधून येथे पोहोचण्यासाठी सुमारे ८ ते दहा दिवस लागतात. आतापर्यंत आम्ही हा भाग नो मॅन्स लँड आहे, असे समजत होतो. कारण सीमा निश्चित करण्यासाठी तेथे कुठलीही भौगोलिक खूण नाही. हल्लीच गुगल मॅपवर पाहिल्यावर आम्हाला हा आपला भाग असल्याची जाणीव झाली. दरम्यान विरोध करण्यापूर्वी चीनने या भागात सुमारे सव्वा किलोमीटर लांबीचा रस्ता बनवला होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.   चिनी सैनिकांच्या अरुणाचल प्रदेशमधील घुसखोरीचा प्रश्न सोडवण्यात आला आहे, अशी माहिती लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी सोमवारी दिली होती. त्यावेळी डोकलाममधील चिनी सैनिकांच्या उपस्थितीमध्येही घट झाल्याचा दावा बिपिन रावत यांनी केला होता. भारताचे ईशान्येकडील राज्य असलेला अरुणाचल प्रदेश हा आपला भाग असल्याचा  दावा चीनकडून नेहमीच करण्यात येतो. चिनी सैनिकांनी डिसेंबरअखेर रस्ते उभारण्याच्या यंत्रसामुग्रीसह अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यातील गावापर्यंत मजल मारली होती. तिथे ते रस्ता बांधण्यासाठीचे सामान घेऊन आले होते. मात्र सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना वेळीच रोखले. चिनी सैनिकांनी घुसखोरी केल्याच्या वृत्तास सुरक्षा संस्थेतील लोकांनी दुजोरा दिला आहे. जवळपास ८ ते १० दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. मात्र तो आता उघडकीस आला होता.  भारतीय जवानांनी वेळीच त्यांना रोखल्याने चिनी सैनिक सोबत आणलेली यंत्रसामुग्री तेथेच सोडून माघारी फिरले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते 

टॅग्स :Arunachal Pradeshअरुणाचल प्रदेशIndian Armyभारतीय जवानchinaचीन