मसूद अझरला अतिरेकी घोषित करण्यामध्ये चीनने पुन्हा घातला खोडा
By Admin | Updated: October 1, 2016 20:48 IST2016-10-01T20:32:59+5:302016-10-01T20:48:05+5:30
मसूद अझरला संयुक्त राष्ट्रामध्ये दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा चीनमुळे धक्का बसला आहे.

मसूद अझरला अतिरेकी घोषित करण्यामध्ये चीनने पुन्हा घातला खोडा
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १ - पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरला संयुक्त राष्ट्रामध्ये दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा चीनमुळे धक्का बसला आहे. भारताने पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रामध्ये मसूद अझरला दहशतवादी घोषित करण्यासाठी ठराव मांडला पण चीनने आपल्या विशेषअधिकाराचा वापर करुन हा ठराव रोखून धरला.
हा ठराव रोखून धरण्याची संयुक्त राष्ट्रामधील चीनची तांत्रिक मुदत येत्या सोमवारी संपणार होती. त्यानंतर भारताने मांडलेला ठराव आपोआप मंजूर होणार होता. चीनला मसूद अझर विरुद्धच्या ठरावावर कोणताही आक्षेप घेता येणार नव्हता.
आणखी वाचा
चीनने हा प्रस्ताव रोखून धरण्याची मुदत आणखी सहा महिन्यांनी वाढवली आहे. त्यामुळे अझरला दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना खीळ बसली आहे. जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा प्रमुख असणा-या मसूद अझरने जानेवारीमध्ये पंजाबच्या पठाणकोटमध्ये हवाई दलाच्या तळावर त्यानंतर उरीमध्ये लष्करी तळावर जैशने दहशतवादी हल्ला घडवून आणला.