शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चीन-पाकिस्तानची झोप उडणार; राफेल आता आणखी घातक होणार! भारतीय हवाई दलाचा मोठा प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 17:30 IST

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान असलेल्या 'राफेल'ची मारक क्षमता आता अधिक वाढणार आहे.

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान असलेल्या 'राफेल'ची मारक क्षमता आता अधिक वाढणार आहे. २०२८ सालापासून राफेल विमानांमध्ये भारताची स्वदेशी बनावटीची 'अस्त्र' ही हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे तैनात केली जाणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे संरक्षण क्षेत्रातील भारताची 'आत्मनिर्भरता' सिद्ध होणार असून परदेशी बनावटीच्या महागड्या शस्त्रांवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

काय आहे 'अस्त्र' क्षेपणास्त्राची ताकद? 

हवाई दल राफेलमध्ये 'अस्त्र एमके १' आणि 'अस्त्र एमके २' या दोन प्रकारच्या क्षेपणास्त्रांचे एकत्रीकरण करणार आहे.

अस्त्र एमके १: हे क्षेपणास्त्र सध्या सुखोई-३० एमकेआय आणि तेजस विमानांमध्ये यशस्वीपणे वापरले जात आहे. याची मारक क्षमता १०० किलोमीटरहून अधिक आहे.

अस्त्र एमके २: हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र अधिक शक्तीशाली असून याची रेंज सुमारे १६० किलोमीटर इतकी आहे. म्हणजेच शत्रूचे विमान नजरेच्या टप्प्यात येण्यापूर्वीच हे क्षेपणास्त्र त्याचा अचूक वेध घेऊ शकते.

फ्रान्सच्या कंपन्यांचे मिळणार तांत्रिक सहकार्य 

राफेलमध्ये भारतीय क्षेपणास्त्र बसवण्यासाठी राफेलची निर्माती कंपनी 'दसॉल्ट एव्हिएशन' आणि रडार यंत्रणेतील तज्ज्ञ कंपनी 'थेल्स' भारताला मदत करणार आहेत. अस्त्र क्षेपणास्त्र राफेलच्या अत्याधुनिक रडार आणि सॉफ्टवेअरशी सुसंगत असावे, यासाठी या कंपन्या तांत्रिक सहकार्य देणार आहेत. यामुळे राफेलची मारक क्षमता जागतिक स्तरावर अधिक अचूक होईल.

अशी होणार अग्नीपरीक्षा! 

मिसाइल राफेलमध्ये तैनात करण्यापूर्वी अनेक कडक चाचण्यांतून जावे लागणार आहे: 

१. सिम्युलेशन टेस्ट: सुरुवातीला कॉम्प्युटरवर चाचणी केली जाईल की क्षेपणास्त्रामुळे विमानाला कोणताही तांत्रिक धोका तर नाही ना? 

२. फ्लाइट टेस्ट: त्यानंतर प्रत्यक्ष उड्डाणादरम्यान क्षेपणास्त्राच्या हालचाली तपासल्या जातील. 

३. लाईव्ह फायरिंग: सर्वात शेवटी प्रत्यक्ष क्षेपणास्त्र डागून त्याची अचूकता तपासली जाईल. या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यावरच ते सेवेत दाखल होईल.

परदेशी शस्त्रांना 'बाय-बाय' 

सध्या राफेलमध्ये युरोपियन बनावटीची महागडी क्षेपणास्त्रे वापरली जातात. मात्र, स्वदेशी 'अस्त्र' मिसाइलमुळे कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन वाचणार आहे. भारताची ही झेप केवळ हवाई दलाची ताकद वाढवणारी नसून, भविष्यात भारत संरक्षण सामग्रीचा मोठा निर्यातदार म्हणून उदयास येण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल