शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

'चीन घुसला, तसंच आम्हीही कर्नाटकात घुसू'; संजय राऊतांचा कर्नाटकला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2022 13:13 IST

बात इंच की नही है.... दिल्लीवाली सरकार म्हणतेय आम्ही चीनला घुसू देणार नाही, एक इंच भी घुसू देणार नाही.

नवी दिल्ली - दिल्लीत सीमाप्रश्नावर केंद्रीय गृहमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सोबत झालेली बैठक सीमा प्रश्नासाठी नव्हे तर सीमेवरील कायदा  सुव्यवस्था राखण्यासाठी होती असे घुमजाव कर्नाटकाचेमुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले. यानंतर आता महाराष्ट्रातील विरोधी नेत्यांनीही सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले. यातच आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी महाराष्ट्रातील विरोधकांवर टीका केली आहे. त्यावरुन, आता शिवसेना नेते खासदार संजय राऊत हेही आक्रमक झाले आहेत. राऊत यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना थेट इशारा दिला असून केंद्र सरकारवरही निशाणा साधाला आहे. 

बात इंच की नही है.... दिल्लीवाली सरकार म्हणतेय आम्ही चीनला घुसू देणार नाही, एक इंच भी घुसू देणार नाही. इंच इंच करत बसले पण चीन घुसला, आम्हीही घुसणार... अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे. तसेच, घुसण्यासाठी आम्हाला कोणाच्या परवानगीची गरज नाही. पण, आम्ही मानतो की हा देश एक आहे, हा वाद चर्चेतून सुटू शकतो. पण, कर्नाटकचे मुख्यमंत्री जाणूनबुजून आग लावत आहेत. मात्र, महाराष्ट्रात कमजोर सरकार बसलंय, जे यावर भूमिका घेत नाही, असेही राऊत यांनी म्हटले. 

महाराष्ट्रातील १०० पेक्षा अधिक लोकांनी कर्नाटक-बेळगांव लढ्यावर बलिदान दिलं आहे. मात्र, या विषयाबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भूमिका घेत नसतील, तर बोम्मईसारखे लोकं आवाज वाढवून बोलणारच. आमचा सरकारशी, तेथील लोकांशी वैयक्तिक वाद नाही, हा गेल्या ७० वर्षांपूर्वीचा वाद आहे. हा मानवतेचा वाद आहे, तेथील मराठी लोकांवर अन्याय, अत्याचार आणि अट्रॉसिटी होत आहे, त्याविरुद्ध आमचा हा लढा आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटले.  

काय म्हणाले कर्नाटकचे मुख्यमंत्री

बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्यांवर टीका करताना म्हटले आहे की, त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे, अशी टीका करत, महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षांच्या सदस्यांवर सीमारेषेचे राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप बोम्मई यांनी केला. ते पत्रकारांशी बोलत होते. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतKarnatakकर्नाटकbelgaonबेळगावChief Ministerमुख्यमंत्री